Ajit Pawar On Sharad Pawar | महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादी कुणी पोहोचवली? दादा थेटच बोलले

Ajit Pawar On Sharad Pawar News Today | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरसभेत शरद पवारांनी २००४ मध्ये केलेल्या स्टेटमेंटवर मोठं वक्तव्य केलं आहे. २००४ मधील पवारांचं स्टेटमेंट हे धादांत खोटं आहे, असं अजित पवार म्हणाले.

शरद पवारांनी २००४बाबत जे सांगितलं. ते धादांत खोटं आहे. मला त्यावेळी वाटत होतं की, भुजबळ मुख्यमंत्री होतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होण्यासाठी इंटरेस्टेड नव्हतो. २००४ साली मुख्यमंत्र्यांची संधी होती. आता आपले वरिष्ठ जे सांगत आहेत की, त्यावेळी काहीजण नवे होते. तसं काही नव्हतं. १९९१ साली शरद पवार यांना संरक्षण मंत्री व्हाव लागलं. त्यावेळी पद्मसिंह पाटलांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव देण्यात आलं होतं. मात्र मध्येच सुधाकरराव नाईक यांचं नाव देण्यात आलं. त्यावेळी शरद पवार यांचं एक वर्ष सुधाकरराव नाईक यांनी ऐकलं नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com