Maharashtra Politics: अजित पवारांच्या त्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या; संजय राऊतांची टीका, नंतर छगन भुजबळांनी छातीठोक सांगितले, VIDEO

Chhagan Bhujbal On Ajit Pawar : बारामतीतून दुसरा आमदार व्हावा, असं अजित पवार यांनी जाहीर सभेत सांगितल्यानंतर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार हे ग्रुपचे कॅप्टन असल्याचे भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal On Ajit Pawar on Vidhan Sabha elections 2024 : बारामतीतून दुसरा आमदार व्हावा अशी इच्छा राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यानंतर बारामतीतून अजित पवार यांनीच लढावे, हा मतदारसंघ सोडू नये, असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे. अजित पवार हे ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते शस्त्र टाकू शकत नाहीत, असं सांगतानाच, ते विधानसभा निवडणूक लढतील असे संकेत मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

दुसरीकडे बारामतीत अजित पवार यांचा पराभव निश्चित असल्याचं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. तुम्ही घर फोडलं आहे, पक्ष फोडला आहे. शरद पवार यांनी सगळं काही दिलं आहे. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आता पश्चाताप होऊन काय फायदा आहे, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com