VIDEO : सचिन लांडे तुतारी फुंकणार ! | Marathi News

Sharad Pawar Rashtrawadi Group : पिंपरी चिंचवड मतदारसंघाचे आमदार विलास लांडे लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं लांडे यांनी सांगितलं आहे.

पिंपरी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार विलास लांडे लवकरच तुतारी हातात घेणार आहेत. तर मी कुठूनही निवडणूक लढवणार नाही, आजूबाजूच्या नेत्यांना मदत करेल असं विलास लांडे यांनी म्हंटलं आहे. शरद पवार यांच्या गटाचे जास्तीतजास्त उमेदवार निवडून यावे यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं देखील लांडे यांनी म्हंटलं आहे. विलास लांडे हे सध्या अजित पावर यांच्या गटाचे माजी आमदार आहेत. पण ते लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करून तुतारी हाती घेणार आहेत. मोठा कार्यक्रम घेऊन शरद पवार यांचे विचार मतदारसंघात पसरवून मी शरद पवार यांच्या गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचं म्हंटलं आहे. दरम्यान, एका पाठोपाठ एक अजित पवार यांच्या गटातून नेते शरद पवार यांच्या गोट्यात चालले असल्याने विधानसभेला अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com