Mahayuti News : महायुतीच्या 'दादा-भाऊ'चा एकत्र विमान प्रवास !

Ajit Pawar And Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानातून मुंबई ते पुण्याचा प्रवास करत आहेत. आगामी विधानसभेच्या दृष्टीने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रवास महत्वाचा मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच विमानातून प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीबद्दल दोघांमध्ये चर्चा झाल्याचं देखील समजत आहे.

अजित पवार यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. गणपतीचं दर्शन त्यांनी यावेळी घेतलं होतं. त्यानंतर आता अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईतून विमानाने एकत्र प्रवास होत आहे. मुंबईतून पुण्याला जाण्यासाठी हा एकत्र प्रवास त्यांनी केल्याचं बोलल जात आहे. पुण्यातील रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांनी हा एकत्र विमान प्रवास केला. आगामी विधानसभेच्या दृष्टीने अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा प्रवास महत्वाचा मानला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com