VIDEO : कृषिमंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर दाखल

Bhagvan Gad Dasra Melava : पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही बहीण भाऊ यावर्षी भगवान गडावर एकत्र दसरा मेळावा घेणार आहेत. त्यासाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे भगवान गडावर दाखल झाले आहेत.

कृषिमंत्री धनंजय मुंडे नगरमधील भगवान गडावर दाखल झालेले आहेत. गडावर त्यांनी भगवान बाबांचं दर्शन घेतलं. थोड्याच वेळात ते दसरा मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचणार आहेत. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आज एकत्र दसरा मेळावा घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. धनंजय मुंडे हे अजित पवार गटासोबत गेले. त्यामुळे आता भाजप आमदार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले आहेत. पंकजा मुंडेंच्या लोकसभा विजयासाठी त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडेंनी बरेच प्रयत्न केले. मात्र, त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. यानंतर हा पहिला दसरा मेळावा आहे. 2023 मध्ये पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला धनंजय मुंडे गैरहजर होते. भाजप नेत्या आमदार पंकजा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील संत भगवान बाबा यांची जन्मभूमी सावरगाव घाट येथे दरवर्षी दसरा मेळावा होत असतो. मात्र यंदाच्या दसरा मेळाव्याला धनंजय मुंडे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या दसरा मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दसरा मेळाव्याला बहीण-भाऊ पहिल्यांदाच एकत्र उपस्थित राहणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बहिण-भाऊ एकत्र येणार असल्याने या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com