Dhangar Reservation : धनगर समाजाची आक्रमक भूमिका; आरक्षणाचा प्रश्न पेटला !

Beed-Latur Highway : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी धनगर समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा मुद्दा पेटलेला दिसून आला. बीड - लातूर महामार्गावर धनगर समाज बांधवांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केलं आहे.

यावेळी शेळ्या-मेंढ्यासह धनगर समाज बांधव रस्त्यावर उतरल्याने जवळपास एक तास या महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. धनगर समाजाला सरकार वारंवार केवळ आश्वासन देत असून एसटीमध्ये समावेशाच्या आश्वासनाची पूर्तता करत नाही असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. त्यामुळे सोमवारी या ठिकाणचे कार्यकर्ते आक्रमक झालेले बघायला मिळाले. दरम्यान, उपस्थित पोलीस अधिकारी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सरकारने यावर गांभीर्याने विचार न केल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com