Salman Khan News | सलमान खानला गोळी मारण्याची भाषा, व्हिडीओ समोर

सलमान खानला मारण्याची भाषा करणारा अजय कश्पचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यासाठी ७० लोक कामाला लावल्याचे तो या व्हिडीओमध्ये म्हणतोय.

अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. आता सलमान खानला गोळी मारण्याची भाषा करणाऱ्या धनंजय तपेसिंग उर्फ अजय कश्यपचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सलमान खानला मारण्यासाठी ७० लोक कामाला लावल्याचे तो एका व्यक्तीला सांगत आहे. यासाठी पैसे पाठवायचे असतील तर कॅनडा मार्गे पाठवा, आपण थेट पैसे घेत नाही असे अजय म्हणतोय. सलमानाला मारण्यासाठी एके ९२ ही बंदूक वापरणार असल्याचे तो म्हणतोय. आता सलमान खान वाचणार नाही अशी धमकीही त्याने दिली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com