Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; व्हिडिओ आला समोर

Sambhajinagar News : संभाजीनगरच्या निराला बाजार भागात एक भीषण अपघात झाला आहे. यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे.

छत्रपती संभाजीनगरच्या निराला बाजारात भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची घटना सिसिटीव्हीमध्ये कैद झाली आहे. निराला बाजार परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये एक गाडी येऊन उभ्या गाड्यांवर धडकल्याने हा अपघात झाला. यात 8 ते 10 दुचाकींसह चारचाकी गाडीचे नुकसान झाले आहे. त्याचबरोरब 4 जण जखमी झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर शहराच्या निराला बाजार भागात गाड्या पार्किंग परिसर आहे. या ठिकाणी येणाऱ्या एका चारचाकी गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने ही गाडी पार्किंगमध्ये उभ्या गाड्यांवर जाऊन आदळली. यात 8 ते 10 दुचाकी वाहनांचं नुकसान झालं आहे. तर एका चारचाकी गाडीचं देखील नुकसान झालं आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात 4 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा सर्व अपघाटाचा व्हिडिओ सिसिटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com