Aalandi Hit & Run News: आळंदीत हिट अँड रन, अल्पवयीन कार चालकाला अटक

Aalandi Hit & Run News Today: पुणे पोर्शे अपघातानंतर आळंदीतही पुनरावृत्ती समोर आलीये. आळंदीजवळ अल्पवयीन कार चालकाकडून महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न झालाय. तसंच ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

पुण्यातील कल्याणीनगर भागात हिट अँड रनचा प्रकार आळंदीतही झाल्याचा समोर आला आहे. आळंदी जवळील वडगाव घेणंद येथील अल्पवयीन कार चालकाने महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं आहे. या अल्पवयीन कार चालकाने जमावाला चिरडण्यासाठी पूर्ण वेगानं कार चालवली. अंगावर काटा आणणारा हा थरार सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com