Aaditya Thackeray News : नोव्हेंबरमध्ये आपलेच सरकार येणार, आदित्य ठाकरेंचा विश्वास

निवडणूक घ्यायची शिंदे सरकारमध्ये हिंमत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच नोव्हेंबरमध्ये आपलंच सरकार येणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी उरणमध्ये सभा घेतली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, ही लढाई महाराष्ट्र लुटणाऱ्यांच्या गद्दारांच्या विरोधात आहे, पण आपण ही लढाई स्वाभिमानाने लढत आहोत. मुख्यमंत्री दिल्लीला जातात, अमावास्या पौर्णिमेला गायब होतात, त्यांनी महाराष्ट्रासाठी कधी काय मागितले का? नोव्हेंबरमध्ये आपले सरकार येणार, तेव्हा या त्यांची आम्ही चौकशी करणार करणार म्हणजे करणार आणि आम्ही त्यांना सोडणार नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com