Nashik News : नाशिकच्या फटका कंपनीत अग्नितांडव : Video

Fire In Nashik : नाशिकच्या एमआयडीसीमध्ये असलेल्या एका फटाका कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. या आगीत अनेक कर्मचारी अडकलेले असल्याची भिती वर्तवली जात आहे.

नाशिक-पुणे रोडवर शिंदे एमआयडीसीमध्ये फटाका बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. आग कशामुळे लागली ते अद्याप अस्पष्ट आहे. पण परिसरात भितीचे वातावरण आहे. एमआयडीसीमध्ये अनेक कर्मचारी अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी आणि अग्निशामन दलाकडून ही यंग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

नाशिक-पुणे रोडवर शिंदे एमआयडीसीच्या परिसरात फटाक्यांच्या कंपनीचे ५-६ गोदाम आहेत. इथे असलेल्या गोदामातून फटक्याचा माल बाहेर पाठवण्यासाठी ट्रकमध्ये भरला जात असताना ही घटना घडली आहे. या आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोळ दिसून येत आहेत. अग्निशामन दलाच्या ४ गाड्या ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या कंपनीत अनेक कर्मचारी आगीत अडकलेले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com