Video: पुण्यातील ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलविरोधात गुन्हा दाखल

जिल्हा परिषदेचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी ज्ञानदेव आबाजी खोसे यांनी ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या आणि संस्थेचे अध्यक्ष जे विकोस्टा (रा. बेंगलोर), संचालक समीर गोरडे (रा. विमाननगर ) यांच्याविरुध्द अनधिकृत शाळा चालविल्याने गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद दिली आहे.

Pune Orchids International School News: पुण्यातील उंड्री येथील ईरा एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलकडे कोणतीही शासनाची परवानगी नसताना इयत्ता पहिली ते दहावीचे अनधिकृत वर्ग चालविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीये. या प्रकरणी जिल्हा परिषदेने धडक कारवाई केली असून या स्कूलच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनधिकृत वर्ग चालविले जाण्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरात गुन्हा दाखल झाल्याची दुसरी घटना आहे. कोंढवा पोलीस ठाण्यात शासनाची, पालकांची फसवणूक केल्याप्रकरणी उंड्री येथील ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com