Raigad VIDEO: पोलीस भरती परीक्षेतील 6 कॉपी बहाद्दर ताब्यात

Raigad Police Bharti News: रायगड पोलीस भरतीत कॉपी केल्याचा गैरप्रकार, लेखी परीक्षेच्या वेळी झाला गैरप्रकार.

रायगड पोलीस भरती प्रक्रियेतून कॉपी केल्याचा गैरप्रकार उघडकीस आला आहे. रायगड पोलीस दलासाठी झालेल्या भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेच्या वेळी गैरप्रकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी 6 उमेदवारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हे 6 उमेदवार आपल्या कानाला इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लावून लेखी परिक्षेला बसले होते. कॉपी रोखण्यासाठी हॅण्डहेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करुन कॉपीचा हा उद्ययावत प्रकार रायगड पोलिसांनी उघडकीस आणला असून 6 उमेदवारांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या उमेदवारांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर डीव्हाइसवरून जे कुणी त्यांच्या संपर्कात होते त्यांचाही शोध सुरू आहे. या बाबत रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com