Airoli Breaking News: पहिल्याच पावसामुळे ऐरोलीत लोखंडी कमान कोसळली

Airoli Breaking News Today: ठाणे-बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फुटाची लोखंडी कमान पावसामुळे कोसळल्याची दुर्घटना घडलेय.

ऐरोली सेक्टर-३ च्या सर्व्हिस रस्त्यावरून ठाणे-बेलापूर रस्त्याला जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फुटाची लोखंडी कमान पावसामुळे कोसळल्याची दुर्घटना घडलेय. सुदैवाने याप्रसंगी रस्त्यावर वाहन नसल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भारत बिजली येथील रेल्वे रुळालगत असलेल्या अवजड वाहनास प्रतिबंध करण्यासाठी लावण्यात आलेली ४० फुटाची लोखंडी कमान  कोसळली असून घटनास्थळी पालिकेचे ऐरोली विभाग अधिकारी, वाहतूक पोलीस आणि रबाळे पोलिसांनी धाव घेतलेय. सदरची कमान ही रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात येत असून सदरची कमान हायड्रा मशीनच्या साहाय्याने काढण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेय. सद्या येथील रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली असून कमान हटावण्यासाठी सर्वोतोपारी प्रयत्न करण्यात येतायत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com