Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांशी चकमकीत 4 जवान शहीद

जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीये.

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील डोडामध्ये रात्री उशिरा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झालीये. भारतीय सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी डोडाच्या उत्तर भागात संयुक्त कारवाई राबवलीये.दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात काही सैनिक जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध सुरू. दरम्यान मागच्या महिन्याभरातील डोडा परिसरात ही पाचवी चकमक आहे.दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 4 भारतीय जवान शहीद झाल्याची माहिती मिळालीये. शहीद झालेल्यांमध्ये अधिकाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. याबाबत लष्कराकडून मात्र अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com