VIDEO: Mahalaxmi Race Course ची 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात

Mahalaxmi Race Course Land News: महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात, मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन आणि ओपन स्पेस साठी सुविधा करण्यात येणार

महालक्ष्मी रेस कोर्स विषयी मोठी बातमी समोर येत आहे. महालक्ष्मी रेस कोर्सची 120 एक्कर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. रेस कोर्सची ही जागा ओपन स्पेस आणि गार्डन साठी जागा वापरली जाणार आहे. दक्षिण मुंबईतील मोक्याची महालक्ष्मी रेस कोर्सची एकूण 211 एक्कर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया तर्फे 1914 साली भाडेकरारावर देण्यात आली होती. 99 वर्षाचा हा करार 2013 साली संपुष्टात आला. आता कराराची मुदत संपल्यानंतर या जागेपैकी 120 एकर जागा राज्य सरकार मार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तर उर्वरित 91 एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडेकरारावर देण्यात येणार आहे. राज्य सरकारनं दिलेल्या या मंजुरीमुळे मुंबईकरांसाठी नियोजित थीम पार्क, गार्डन आणि ओपन स्पेस साठी सुविधा करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com