गाव करी ते राव न करी ! ग्रामस्थांनी स्वबळावर उभारले कोविड केंद्र

चंद्रपूर
चंद्रपूर
Published On

चंद्रपूर : चंद्रपूर Cahndrapur जिल्ह्यात कोरोनाच्या Corona दुसऱ्या Second लाटेत Wave शहरी भागासह ग्रामीण भाग अधिक प्रभावित झाला. कोरोना रुग्ण रुग्णालयात जाण्यासाठी संकोच करत होते. Villagers Built The Covid Center On Their Own

कोविड केंद्रात आढळणाऱ्या गैरसोयी यातील प्रमुख कारण असल्याचे लक्षात आल्यावर पाथरी Pathari गावातील नागरिकांनी कोरोना उपचार केंद्र उभारणीत एकजूट दाखविल्याचे बघायला मिळत आहे. पाथरी गावाने केलेले काम 'गाव करी ते राव न करी' या श्रेणीत मोडणारे ठरले आहे. 

हे देखील पहा -

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली Sawali तालुक्यात असणाऱ्या, सुमारे 10 हजार लोकसंख्येच्या पाथरी ग्रामपंचायतीने Garmpanchayat स्वबळावर On Their Own 50 खाटांचे कोविड केंद्र Covid Center उभारून इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे. आपल्या आसपास वाढणारे कोविड रुग्ण ग्रामस्थांना अस्वस्थ करत होते. गडचिरोली Gadchiroli जिल्ह्याच्या सीमेवर असलेले एका टोकावरचे पाथरी गाव वाढत्या रुग्णसंख्येने हादरले होते. Villagers Built The Covid Center On Their Own

तालुक्याच्या ठिकाणी उपचार केंद्रात जाण्यास हे रुग्ण तयार होत नव्हते. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राची तोकडी क्षमता लक्षात घेता तातडीने याबाबत निर्णय घेणे गरजेचे होते. ग्रामस्थ-ग्रामपंचायत-गावातील युवक यांनी एकत्र येत अध्यापन बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यांमध्ये कोविड उपचार केंद्र उभारण्याचे ठरविले. गावाने मनात आणल्यावर खाटा-गाद्या-ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि इतर वैद्यकीय सामुग्रीची आपसूक सोय झाली. 

काही दानशूर मदतीला धावले तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील शासकीय सेवेतील डॉक्टरांनी यातील उपचारासाठी सहकार्य करण्याचे ठरविले आणि उभे झाले 50 खाटांचे कोविड उपचार केंद्र ! Villagers Built The Covid Center On Their Own

दुसऱ्या लाटेत रुग्णवाढ झाली असली तरी कोविड केंद्रे कमी असल्याने उपचारात होणारी हयगय केवळ समाजाच्या निर्धारातून समर्थपणे दूर झाली. या केंद्रातून केवळ 20 दिवसात 40 बाधीत समाधानी होत घरी गेले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र तिसरी लाट पुढ्यात आहे. पाथरीसारख्या गावाने दाखविलेला एकजुटीचा मार्ग राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी प्रेरणादायक ठरला आहे.

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com