Viral Video : झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर केला अफलातून डान्स; व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

सामना जिंकल्यानंतर झिम्बाव्बे संघाचे खेळाडू आनंदाच्या भरात मैदानावर जोरदार थिरकले.
ZiM vs Pak T20 World Cup 2022
ZiM vs Pak T20 World Cup 2022 saam tv

Zim vs Pak T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्ड कपच्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला जोरदार झटका दिला. झिम्बाव्बे संघ पाकिस्तानवर (Pakistan) मात केल्यामुळे चर्चेत आला आहे. जगभरातून झिम्बाव्बे संघाचं कौतुक होत आहे. पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर झिम्बाव्बे संघाने मोठा आनंद व्यक्त केला. सामना जिंकल्यानंतर झिम्बाव्बे संघाचे खेळाडू आनंदाच्या भरात मैदानावर जोरदार थिरकले. या खेळाडूंचा डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. (Cricket News)

झिम्बाव्बे संघाच्या कर्णधाराने केला जोरदार डान्स

झिम्बाव्बे संघाचे खेळाडूंनी पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर मोठा आनंद व्यक्त केला. तर सर्व खेळाडूंनी नाचून आनंद व्यक्त केला. या खेळाडूंचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ झिम्बाव्बे क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे. सदर व्हिडिओ २ मिनिटे २० सेकंदाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू थिरकताना दिसत आहे.

सदर व्हिडिओमध्ये दिसत आहे की, झिम्बाव्बे संघाच्या खेळाडूंनी त्यांच्या कर्णधार क्रेग इर्विनला घेरलं आहे. या व्हिडिओमध्ये सर्व खेळाडू त्यांच्या डान्सची झलक दाखवत आहे. त्यानंतर शेवटाला सर्वच जण डान्स करतात.

पाकिस्तानला झिम्बाब्वेनं दिला ४४० व्होल्टचा झटका

पाकिस्तानला झिम्बाब्वेनं तगडा झटका दिला. रोमहर्षक लढतीत अवघ्या एका धावेने झिम्बाब्वेने पाकिस्तानला पराभूत करून 'हम भी कुछ कम नहीं है' असंच दाखवून दिलं आहे.

भारताकडून पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवातून पाकिस्तानचा संघ अद्याप सावरलेला दिसत नाही. कारण दुसऱ्या सामन्यात तुलनेने कमकुवत असलेल्या झिम्बाब्वे संघाकडून पाकिस्तान पराभूत झाला आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे फलंदाजांनी सुरुवातही झोकात केली.

ZiM vs Pak T20 World Cup 2022
T20 World Cup: पाकिस्तानच्या पराभवानंतर मिस्टर बीन का होतोय ट्रेंड? झिम्बाब्वेच्या राष्ट्रपतींनीही केलं ट्वीट

मात्र, मधल्या षटकांत धावगती रोखली गेली. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अंकुश ठेवला. शेवटच्या काही षटकांत बऱ्यापैकी फटकेबाजी करून झिम्बाब्वेच्या तळाच्या फलंदाजांनी संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. झिम्बाब्वेने आठ फलंदाज गमावून १३० धावा केल्या. हे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला सुरुवातीलाच झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी धक्के देण्यास सुरुवात केली.

मोहम्मद रिझवान (१४ धावा) आणि बाबर आझम (४ धावा) स्वस्तात तंबुत परतले. त्यानंतर शान मसूदने डाव सावरला. त्याने ४४ धावा केल्या. मात्र, अन्य फलंदाजांनी त्याला साथ दिली नाही. परिणामी सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचला. शेवटच्या षटकात अकरा धावांची गरज होती. शेवटच्या तीन चेंडूंत ३ धावांची गरज असताना, गोलंदाजाने कमाल केली.

दोन चेंडू निर्धाव टाकले. त्यातील एका चेंडूवर विकेट घेतली. त्यानंतर एका चेंडूवर तीन धावांची गरज होती. मात्र, दोन धावा घेण्याच्या नादात विकेट गमावली आणि पाकिस्तानला झिम्बाब्वेने पराभूत करण्याची किमया साधली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com