World Cup Qualifiers: दोनदा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला झिम्बाब्वेने दाखवला इंगा; WC खेळण्याचं स्वप्नं भंगणार?

Zimbabwe vs West Indies: या पराभवानंतर वेस्ट इंडिज संघावर आता स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.
zim vs wi
zim vs wisaam tv

WC Qualifiers 2023: आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेचा थरार यावेळी भारत रंगणार आहे. या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर झिम्बाब्वेमध्ये वर्ल्ड कप पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. शनिवारी (२४ जून) झालेल्या सामन्यात झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात झिम्बाब्वेने वेस्ट इंडिज संघाला पराभूत करत मोठा उलटफेर केल्याचे पाहायला मिळाले आहे. या पराभवानंतर वेस्ट इंडिज संघावर आता स्पर्धेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे.

वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेतील १३ व्या सामन्यात झिम्बाब्वेने ४९.५ षटकात १० गडी बाद २६८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघाचा डाव ४४.४ षटकात अवघ्या २३३ धावांवर संपुष्टात आला. यासह झिम्बाब्वे संघाने या सामन्यात ३५ धावांनी जोरदार विजय मिळवला.

zim vs wi
Team India Squad: चेतेश्वर पुजारा बाहेर! तर IPL गाजवणाऱ्या 'या' २ खेळाडूंना थेट टीम इंडियात संधी

वेस्ट इंडिजच्या हातून सामना निसटला...

झिम्बाब्वे विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात झालेला या सामन्यात वेस्ट इंडिज संघ मजबूत स्थितीत होता. गोलंदाजीत आणि फलंदाजीत वेस्ट इंडीज संघातील खेळाडूंनी दमदार सुरुवात केली होती.

गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, २५ व्या षटकापर्यंत अवघ्या ११२ धावांवर झिम्बाब्वेचे ५ फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी सिकंदर रझाला दोनदा जीवदान दिले.

याचा पुरेपूर फायदा घेत रझाने संघासाठी महत्वपूर्ण खेळी केली. त्याने ५८ चेंडूंचा सामना करत ६ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ६८ धावांची खेळी केली. त्याला चांगली साथ देत रायन बर्लने देखील बहुमूल्य खेळी केली. त्याने ५७ चेंडूंचा सामना करत ५० धावा कुटल्या. या खेळीच्या जोरावर झिम्बाब्वेने २६८ धावांचा डोंगर उभारला होता. (Latest sports updates)

zim vs wi
World Cup 1983: BCCI कडे वर्ल्ड कप जिंकलेल्या खेळाडूंना द्यायलाही पैसे नव्हते; लतादीदींनी केली होती मोठी मदत..

तर वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, डावाची सुरुवात करताना सलामीवीर फलंदाजांनी ४३ धावांची भागीदारी केली. या डावात काईल मेयर्सने ७२ आणि शाई होपने ३० धावांची खेळी केली.

दोघांनी मिळून १३४ धावांची भागीदारी केली. या सामन्यात एक वेळ अशी होती जेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या ४ गडी बाद १७५ धावा होती. त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com