IND VS SA T20: युजवेंद्र चहल दाखवणार जलवा, पहिल्याच सामन्यात 'हा' विक्रम मोडणार

टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल (yuzvendra chahal ) भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात होणाऱ्या टी-२० (T-20) मालिकेत आपला जलवा दाखवण्यास सज्ज झाला आहे.
yuzvendra chahal
yuzvendra chahal Saam Tv
Published On

मुंबई: आयपीएलमध्ये (IPL) जबरदस्त कामगिरी करणारा टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल (yuzvendra chahal ) भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) यांच्यात होणाऱ्या टी-२० (T-20) मालिकेत आपला जलवा दाखवण्यास सज्ज झाला आहे. या मालिकेत तो एक विक्रम आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. ९ जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत चहल हा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचा (R ashwin) विक्रम मोडीत काढू शकतो. सध्या अश्विन हा भारताकडून टी-२० मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. आता हा विक्रम चहल आपल्या नावावर करू शकतो. ( yuzvendra chahal Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

अश्विनच्या नावे २७६ विकेट

आर अश्विनच्या नावावर आतापर्यंत २८२ टी-२० सामन्यांत २७६ विकेट आहेत. तर चहलनं २४२ टी-२० सामन्यांत आतापर्यंत २७४ विकेट घेतल्या आहेत. अश्विनच्या विक्रमाशी बरोबरी करण्यासाठी चहलला अवघ्या २ विकेट हव्या आहेत. तीन विकेट घेतल्यानंतर चहल अश्विनला मागे टाकणार आहे.

yuzvendra chahal
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात पदार्पणातच द्विशतक ठाेकणारा सुवेद पारकर ठरला मुंबईचा दुसरा फलंदाज

आयपीएलमध्ये चहल पर्पल कॅपचा मानकरी

यंदाच्या आयपीएलमध्ये चहलनं जबरदस्त गोलंदाजी केली आहे. या स्पर्धेत त्याने एकूण २७ विकेट घेतल्या. या स्पर्धेतील पर्पल कॅपचा मानकरी तो ठरला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत चहल हा अत्यंत धोकादायक गोलंदाज ठरू शकतो. आयपीएलच्या या मोसमात चहलनं दिल्लीविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती आणि सामन्याचं चित्रच पालटलं होतं.

युजवेंद्र चहलनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत तीन विकेट घेतल्यानंतर तो अश्विनला मागे टाकणार आहे. तो टी-२०मध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरेल. चहलचा सध्याचा फॉर्म बघता, अश्विनचा विक्रम या मालिकेत मोडीत निघेल, असे बोलले जात आहे. युजवेंद्र चहलने भारतासाठी खेळताना आतापर्यंत ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६८ विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर १३१ सामन्यांमध्ये १६६ विकेट आहेत. चहलने हरयाणाकडून खेळताना टी-२० सामन्यांत एकूण ४० विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com