LSG VS CSK IPL 2023: एमएस धोनी यंदाचं हंगाम संपल्यानंतर निवृत्त होणार, हे एमएस धोनीचं शेवटचं हंगाम असणार आहे. अशा अनेक चर्चा आयपीएल २०२० स्पर्धेपासूनच सुरु आहे. मात्र तो सलग ३ वर्षांपासुन मैदानात येऊन चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसून येत आहे.
आयपीएल २०२३ चे हंगाम धोनीचे शेवटचे हंगाम असेल अशा चर्चा सुरु असताना आता एमएस धोनीने आपल्या निवृत्तीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (MS Dhoni On Retirement)
निवृत्तीबाबत बोलताना धोनी काय म्हणाला?
एमएस धोनी हा २००८ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करतोय. त्याने २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केले होते. त्यानंतर धोनी लवकरच आयपीएल स्पर्धेतून देखील माघार घेणार असे म्हटले जात होते. मात्र ३ वर्षे उलटून गेल्यानंतरही धोनीचा तोच जुना अंदाज पाहायला मिळत आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी देखील धोनी युवा खेळाडूंना लाजवेल अशी विकेटकीपिंग करतोय. तसेच शेवटच्या षटकांमध्ये येऊन षटकार मारताना दिसून येत आहे. (Latest sports updates)
दरम्यान निवृत्तीच्या चर्चा सुरु असताना एमएस धोनीने आता मोठे वक्तव्य केले आहे. लखनऊच्या एकाना स्टेडियमवर सुरु असलेल्या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी एमएस धोनीला निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. अँकर डॅनी मॉरिसनने एमएस धोनीला विचारले की, 'शेवटची आयपीएल एन्जॉय करतोय ना..?' यावर उत्तर देत एमएस धोनी म्हणाला की,'ते तुम्हीच ठरवलंय.' हे बोलून धोनी हसू लागला. यावरून असे दिसून येत आहे की, एमएस धोनी येणाऱ्या हंगामात देखील खेळताना दिसून येऊ शकतो.
तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात केएल राहुल ऐवजी कृणाल पंड्या संघाचे नेतृत्व करताना दिसून येत आहे. तर फलंदाज करण शर्माला हा सामना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. चेन्नईच्या संघात कुठलाही बदल करण्यात आला नाहीये.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
लखनऊ सुपर जायंट्स :
काइल मेयर्स, मनन वोहरा, करण शर्मा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन (विकेटकीपर), कृणाल पांड्या (क), कृष्णप्पा गौथम, नवीन-उल-हक, रवी बिश्नोई, मोहसिन खान
चेन्नई सुपर किंग्ज :
ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चहर,मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, महिश थिक्षणा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.