Team India News: WTC अन् वर्ल्डकपही गमावला, पण टीम इंडियाने २०२३ मध्ये काय कमावलं?

Team India Record In 2023: गेल्या ६५ सामन्यांमध्ये कसा राहिला भारतीय संघाचा रेकॉर्ड? हे वर्ष भारतीय संघासाठी कसं होतं? जाणून घ्या.
Team India
Team India saam tv news
Published On

Year Ender 2023, Team India Record:

भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये बहुप्रतिक्षित बॉक्सिंग डे कसोटीला येत्या २६ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. हा भारतीय संघाचा २०२३ वर्षातील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. तर या वर्षातील हा भारताचा ६७ वा सामना असणार आहे. गेल्या ६५ सामन्यांमध्ये कसा राहिला भारतीय संघाचा रेकॉर्ड? हे वर्ष भारतीय संघासाठी कसं होतं? जाणून घ्या.

भारतीय संघाने खेळलेल्या ६५ सामन्यांपैकी ४५ सामने जिंकले आहेत. तर १६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान २ सामने ड्रॉ आणि २ सामने अनिर्णित राहिले आहेत.

वनडेत कशी राहिली कामगिरी?

भारतीय संघाने यावर्षी वनडेत दमदार खेळ केला आहे. रोहितच्या नेतृत्वात खेळताना वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील फायनलमध्ये सलग १० सामने जिंकले. मात्र फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला. यावर्षी खेळलेल्या ३५ वनडे सामन्यांपैकी २७ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तर केवळ ७ सामने गमावले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला.

कसोटीत असा राहिला रेकॉर्ड..

यावर्षी भारतीय संघाला केवळ ७ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान भारतीय संघ वेस्टइंडीज आणि ऑस्ट्रेलियासोबत २ हात करताना दिसून आला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ आणि वेस्टइंडीज विरुद्धच्या २ अशा ८ सामन्यांपैकी ३ सामन्यात भारताने बाजी मारली. तर २ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान २ सामने ड्रॉ झाले. (Latest sports updates)

Team India
IND vs SA: भारत-द.आफ्रिका कसोटीपूर्वी वाईट बातमी! टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारं कारण आलं समोर

टी -२० क्रिकेटमध्ये अशी राहिली कामगिरी..

भारतीय संघाने वनडेसह टी -२० क्रिकेटमध्येही दमदार कामगिरी केली. यावर्षी भारतीय संघाला २३ टी -२० सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान १५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. तर ७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर १ सामना अनिर्णीत राहिला.

Team India
Ind vs Sa, Playing XI Prediction: पहिल्या कसोटीसाठी दिग्गजाने निवडली प्लेइंग 11; प्रमुख गोलंदाजाला ठेवलं बाहेर

आयसीसी फायनल..

वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी सोडली तर भारतासाठी हे वर्ष चांगलं गेलं. यावर्षी भारतीय संघाला आयसीसीच्या २ फायनल खेळण्याची संधी मिळाली. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला.

मात्र या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. तर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाने सलग १० सामने जिंकले आणि वर्ल्डकपची अंतिम फेरी गाठली. मात्र इथेही ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाला पुन्हा नडला. अंतिम फेरीत भारताचा पराभव झाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com