Champions Trophy 2025: शुभमन गिल की यशस्वी जयस्वाल? चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण असेल रोहितचा ओपनिंग पार्टनर?

Team India Opening Batsman Combination: पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. दरम्यान या स्पर्धेत रोहितसोबत कोण असेल सलामीवीर फलंदाज? जाणून घ्या.
Champions Trophy 2025: शुभमन गिल की यशस्वी जयस्वाल? चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण असेल रोहितचा ओपनिंग पार्टनर?
team indiacanva
Published On

बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पाकिस्तानला आयसीसी स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचा थरार पाकिस्तानमध्ये रंगणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०१३ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर (ICC Champions Trophy) नाव कोरलं होतं.

आता २०२५ मध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ही ट्रॉफी उंचावण्याच्या प्रतीक्षेत असणार आहे. या स्पर्धेत रोहित शर्मा भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. दरम्यान रोहितचा पार्टनर कोण असेल? जाणून घ्या.

Champions Trophy 2025: शुभमन गिल की यशस्वी जयस्वाल? चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण असेल रोहितचा ओपनिंग पार्टनर?
IND vs BAN: टीम इंडियाचा हा फलंदाज बांगलादेशला एकटा नडणार! रोहित - विराटपेक्षा खतरनाक आहे रेकॉर्ड

भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. जिथे त्याला भारतीय फॅन्सने काही प्रश्न विचारले. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे,' चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) डावाची सुरुवात करावी आणि शुभमन गिलने मध्यक्रमात फलंदाजीला यायला हवं का? या प्रश्नाचं उत्तर देताना दिनेश कार्तिक म्हणाला की, ' का? शुभमन गिल आणि रोहित शर्माची जोडी चांगली आहे. मात्र जयस्वालकडे बॅकअप सलामीवीर फलंदाज म्हणून खेळण्याची संधी असणार आहे. जर गिल फ्लॉप ठरला. तर जयस्वालला संधी दिली जाऊ शकते.'

Champions Trophy 2025: शुभमन गिल की यशस्वी जयस्वाल? चॅम्पियन्स ट्रॉफीत कोण असेल रोहितचा ओपनिंग पार्टनर?
Champions Trophy 2025: 'स्टेडियममध्ये ना धड सीट, ना बाथरुम...' PCB अधिकाऱ्याकडूनच पाकिस्तानची पोलखोल

शुभमन गिलच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, तो श्रीलंका दौऱ्यावर रोहितसोबत डावाची सुरुवात करताना दिसून आला होता. या मालिकेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

मालिकेतील ३ सामन्यांमध्ये त्याने १९ च्या सरासरीने ५७ धावा केल्या. त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती.

शुभमन गिलला टी-२० वर्ल्डकपसाठी भारतीय संघात राखीव खेळाडू म्हणून स्थान देण्यात आलं होतं. त्यानंतर तो झिम्बाब्वे आणि श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसून आला होता.

येत्या ५ सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. दरम्यान या स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करुन दाखवावी लागणार आहे. कारण बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी ही स्पर्धा अतिशय महत्वाची असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com