WTC Final Scnario: भारत- ऑस्ट्रेलियासह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याचा चान्स; पाहा कसं आहे समीकरण

WTC Final Scenario News In Marathi: दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत - ऑस्ट्रेलियासह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याचा चान्स असणार आहे.
WTC Final Scnario: भारत- ऑस्ट्रेलियासह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याचा चान्स; पाहा कसं आहे समीकरण
wtcsaam tv
Published On

भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना भारतीय संघाने १८४ धावांनी गमावला.

या पराभवासह भारतीय संघ मालिकेत २-१ ने पिछाडीवर आहे. दुसरीकडे पाकिस्तानला पराभूत करत दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. फायनलमध्ये जाणारा दुसरा संघ कुठला असेल, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. दरम्यान भारत, ऑस्ट्रेलियासह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याची सुवर्णसंधी असणार आहे.

WTC Final Scnario: भारत- ऑस्ट्रेलियासह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याचा चान्स; पाहा कसं आहे समीकरण
IND vs AUS: रोहित - विराट सिडनीत शेवटचा सामना खेळणार? दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

भारतीय संघाला जर फायनलमध्ये प्रवेश करायचा असेल, तर सिडनी कसोटी सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. त्यानंतर श्रीलंकेच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयासाठी प्रार्थना करावी लागेल. असं झाल्यास भारतीय संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. तर ऑस्ट्रेलियाचे ३ सामने शिल्लक आहेत. फायनलमध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ३ पैकी केवळ १ सामना जिंकायचा आहे. या दोन्ही संघांसह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याची संधी आहे.

WTC Final Scnario: भारत- ऑस्ट्रेलियासह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याचा चान्स; पाहा कसं आहे समीकरण
IND vs AUS: यशस्वीच्या वादग्रस्त विकेटवर रोहितची शॉकींग Reaction;संघाचा कॅप्टन असं कसं म्हणू शकतो?

श्रीलंकेला फायनलमध्ये जाण्याची संधी

भारत - ऑस्ट्रेलियासह श्रीलंकेलाही फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. श्रीलंकेला घरच्या मैदानावर खेळताना, दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना करावा लागला. या मालिकेतील पराभवानंतर श्रीलंकेची फायनलमध्ये जाण्याची शक्यता कमी झाली. पण फायनलमध्ये जाण्याचा मार्ग अजूनही पूर्णपणे बंद झालेला नाही. श्रीलंकेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या अंतिस सामन्याच्या निकालाची वाट पाहावी लागणार आहे.

WTC Final Scnario: भारत- ऑस्ट्रेलियासह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याचा चान्स; पाहा कसं आहे समीकरण
IND vs AUS: बॅटिंगनंतर आता बॉलिंगमध्येही हेड नडला! पंतची विकेट ते आगळं वेगळं सेलिब्रेशन का केलं? जाणून घ्या कारण

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सिडनी कसोटी सामना ड्रॉ झाल्यास श्रीलंकेचा फायनलमध्ये जाण्याचा चान्स वाढणार आहे. कारण, ही मालिका झाल्यानंतर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे.

WTC Final Scnario: भारत- ऑस्ट्रेलियासह आणखी एका संघाला फायनलमध्ये जाण्याचा चान्स; पाहा कसं आहे समीकरण
IND vs AUS: बॉक्सिंग डे कसोटी ड्रॉ झाल्यास टीम इंडियासाठी कसं असेल WTC Final मध्ये जाण्याचं समीकरण?

जर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ड्रॉ राहिला आणि श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं, तर श्रीलंकेचा संघ टॉप २ मध्ये प्रवेश करु शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com