WTC Final: मालिकाही गमावली अन् फायनलही; WTC Final मध्ये भिडणारे 2 फायनलिस्ट संघ ठरले

India vs Australia 5th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यासह भारतीय संघाने ही मालिकाही गमावली आहे.
WTC Final: मालिकाही गमावली अन् फायनलही; WTC Final मध्ये भिडणारे 2 फायनलिस्ट संघ ठरले
team indiatwitter
Published On

भारतीय संघाला २०२५ वर्षाची सुरुवात हवी तशी करता आलेली नाही. सिडनीच्या मैदानावर पार पडलेल्या पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ २-१ ने आघाडीवर होता.

त्यामुळे भारतीय संघाला ही मालिका बरोबरीत आणण्याची संधी होती. मात्र भारताने हा सामना ६ गडी राखून गमावला आहे. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-१ ने खिशात घातली. यासह भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शर्यतीतून बाहेर फेकून फायनलचं तिकीट मिळवलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारतीय संघाला हा सामना कुठल्याही परिस्थितीत जिंकायचा होता. मात्र हा निर्णायक सामना भारताने गमावला आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाणारा पहिला संघ ठरला होता. आता भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली आहे.

WTC Final: मालिकाही गमावली अन् फायनलही; WTC Final मध्ये भिडणारे 2 फायनलिस्ट संघ ठरले
IND vs AUS 5th Test: एक दशकाचं 'विराट' वर्चस्व संपुष्टात! टीम इंडियाचा दारुण पराभव; ऑस्ट्रेलियाने ३-१ ने मालिका जिंकली

दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. दक्षिण आफ्रिकेची विजयाची सरासरी ६६.६७ इतकी आहे. तर ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ६३.७३ इतकी आहे. तर मालिका गमावलेल्या भारतीय संघाची विजयाची सरासरी ५०.०० वर जाऊन घसरली आहे.

WTC Final: मालिकाही गमावली अन् फायनलही; WTC Final मध्ये भिडणारे 2 फायनलिस्ट संघ ठरले
IND vs AUS 5th Test: ओय कॉन्टास, शॉट नाही लागत का?; जयस्वालचा हिंदी तडका, मैदानातच स्लेजिंगचा भडका, VIDEO

गेल्या २ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय संघाने फायनल गाठली होती. मात्र या दोन्ही फायनलमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने एन्ट्री केली होती आणि भारतीय संघाचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाने फायनल गाठली आहे. यावेळी लॉर्ड्सच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना दिसेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com