महिला प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सत्रातील 16 वा सामना शनिवारी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने हंगामातील पाचवा विजय नोंदवून फायनलचे तिकीट जवळपास पक्के केले आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.
यातच पहिले सलग चार सामने गमावलेल्या गुजरात जायंट्सने शेवटच्या सामन्यात आरसीबीला पराभूत केले होते. आता या पराभवामुळे संघ जवळपास या या हंगामातून बाहेर झाला आहे. यातच मुंबई इंडियन्स संघ या विजयासह अव्वल स्थानावर पोहोचला आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरने चांगली खेळी करत नाबाद 95 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या सामन्यात आधी फलंदाजी करत गुजरात संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 190 धावा केल्या होत्या. या डावात कर्णधार बेथ मुनीने गुजरातसाठी 66 धावांची खेळी केली. तर दयालन हेमलताने 74 धावा केल्या होत्या. या दोघांच्या जबरदस्त खेळीमुळे संघाने धावसंख्या 190 पर्यंत नेली. (Latest Marathi News)
गुजरात संघाच्या फलंदाजीनंतर मुंबई इंडियन्स फलंदाजीसाठी मैदानात उतरली. मुंबईची सुरुवात चांगली झाली आणि पॉवरप्लेने धावसंख्या 50 च्या आसपास पोहोचवली. त्यानंतर यस्तिका भाटिया 49 धावांवर बाद झाली. यानंतर नॅट सीव्हर ब्रंट आणि हेली मॅथ्यूजही झटपट बाद झाल्या. इथून संघाच्या अडचणी वाढल्या, मात्र एका टोकाला कर्णधार हरमनप्रीत कौर खंबीरपणे उभी राहिली.
हरमनप्रीत कौरने जबरदस्त फलंदाजी केली आणि नाबाद राहिली. तिने 48 चेंडूत 95 धावा केल्या. या खेळीत तिने 10 चौकार आणि पाच षटकार मारले आणि मुंबई इंडिअन्सला विजय मिळवून दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.