World Cup 2023: विश्वचषक गमावल्याच्या ४ दिवसानंतर केएल राहुलचं पहिलं ट्विट, दोन शब्दात व्यक्त केली मनातील सल

KL Rahul Rahul First Tweet after World Cup Final: टीम इंडियाचा टी-२० सामना आज गुरुवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मात्र, तरीही काही खेळाडूमध्ये विश्वचषकाच्या पराभवाची निराशा कायम असल्याचे दिसून आलं आहे.
KL Rahul Rahul News
KL Rahul Rahul NewsTwitter
Published On

KL Rahul Rahul Tweet:

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभव झाल्याने देशातील १४० कोटी लोकांचं स्वप्न भंगलं आहे. विश्वचषक गमावल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडूही अद्याप निराशेच्या छायेत आहेत. एकीकडे टीम इंडियाचा टी-२० सामना आज गुरुवारी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मात्र, तरीही काही टीम इंडियाच्या खेळाडूमध्ये विश्वचषकाच्या पराभवाची निराशा कायम असल्याचे दिसून आलं आहे. (Latest Marathi News)

राहुलने व्यक्त केली मनातील सल

विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने १० सामने जिंकले. मात्र, स्पर्धेच्या अंतिम सामन्यातच टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावं लागलं. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ गडी राखून टीम इंडियावर मात केली.

अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने टीम इंडियाची तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याची संधी हुकली. टीम इंडियाने गेल्या रविवारी चषक गमावला. मात्र, अंतिम सामन्याच्या चार दिवसानंतर टीम इंडियाचा उप-कर्णधार केएल राहुलनेपहिलं ट्विट करत मनातील सल व्यक्त केली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

KL Rahul Rahul News
Viral Video: भारीच! कलिंगडावर कोरले 'कॅप्टन कूल' धोनीचे चित्र; टॅलेंट पाहून थक्क व्हाल... VIDEO

केएल राहुलची दमदार फलंदाजी

केएल राहुलने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. त्याने अनेक सामन्यात संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. केएल राहुलने अंतिम सामन्यात टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा चोपल्या. केएल राहुलने स्पर्धेतील ११ सामन्यातील १० डावात ७५.३३ च्या सरासरीने आणि ९०. ७६ च्या स्टाइक रेटने ४५२ धावा केल्या.

भारताकडून स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. विश्वचषक गमावल्याच्या चार दिवसानंतर केएल राहुलने ट्विट करत, अजून दु:ख होत आहे... असं लिहिलं आहे. तसेच सामन्यातील काही फोटोही शेअर केले आहेत.

KL Rahul Rahul News
Marlon Samuels: वेस्टइंडिजला वर्ल्ड चॅम्पियन बनवणाऱ्या खेळाडूवर ICC ची कारवाई; घातली ६ वर्षांची बंदी, काय आहे प्रकरण?

ऑस्ट्रेलियाने चारली टीम इंडियाला धूळ

विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुलने दमदार फलंदाजी केली. तर मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराहने चांगली गोलंदाजी केली. मात्र, अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी सामना जिंकला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com