World Cup: महिला क्रिकेट विश्वचषकाची आजपासून सुरुवात; पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर पाकिस्तानचे आव्हान

महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ स्पर्धेची सुरुवात (World Cup 2022) आजपासून सुरु होणार आहे.
World Cup: महिला क्रिकेट विश्वचषकाची आजपासून सुरुवात; पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर पाकिस्तानचे आव्हान
World Cup: महिला क्रिकेट विश्वचषकाची आजपासून सुरुवात; पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर पाकिस्तानचे आव्हान Saam Tv
Published On

वृत्तसंस्था: महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ स्पर्धेची सुरुवात (World Cup 2022) आजपासून सुरु होणार आहे. यावर्षी या स्पर्धेचे आयोजन न्यूझीलंडमध्ये (New Zealand) करण्यात येणार आहे. विश्वचषकाचा सलामीचा सामना स्पर्धेचे यजमान असलेल्या न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) खेळवण्यात येणार आहे. तर भारताचा (India) पहिला सामना हा पाकिस्तानबरोबर (Pakistan) होणार आहे. यंदाच्या विश्वचषकामध्ये ८ संघांमध्ये २७ सामने खेळवण्यात येणार आहेत. यानंतर गुणपत्रकानुसार, ४ संघांमध्ये सेमी फायनल्सचे सामने रंगणार आहेत.

हे देखील पहा-

यानंतर ३ एप्रिलला फायनल (Final) खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकाचे सर्व सामने न्यूझीलंड येथील ६ शहरांमध्ये खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने (BCCI) महिला क्रिकेट (Cricket) विश्वचषकाकरिता १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. मिताली राजकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर, हरमनप्रीत कौरकडं उपकर्णधाराची जबाबादारी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज शिखा पांडेला संघामध्ये स्थान मिळाले नाही. चाहत्यांकरिता हा धक्का मानला जाणार आहे.

शिखा पांडे मागील वर्षी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तिने ऑस्ट्रेलियाच्या (Australia) एलिसा हिलीला क्लीन बोल्ड केले होते. या चेंडूची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. भारताचा माजी खेळाडू वसीम जाफरने तर या चेंडूला महिला क्रिकेटमधील बॉल ऑफ द सेन्चुरी असे म्हटले होते. भारतीय संघ विश्वचषकात पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. हा सामना ६ मार्च रोजी बे-ओव्हल तौरंगा या ठिकाणी होणार आहे. यंदाचा महिला विश्वचषक अनेक कारणांनी वेगळा ठरणार आहे.

यातच महिला क्रिकेट विश्वचषकामध्ये सलग दुसऱ्यांदा DRS चा वापर होणार आहे. इंटरनॅशनल क्रिकेट काउंसिलने (ICC) दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च ते ३ एप्रिलच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे कव्हरेज अभूतपूर्व असणार आहे. महिला क्रिकेट विश्वचषकात डीआरएस वापरण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. २०१७ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या दरम्यान याचा पहिल्यांदा वापर करण्यात आला होता.

World Cup: महिला क्रिकेट विश्वचषकाची आजपासून सुरुवात; पहिल्या सामन्यात टीम इंडियासमोर पाकिस्तानचे आव्हान
Petrol Diesel Price Today: रशिया- युक्रेन युद्धामुळे देशातील पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला? जाणून घ्या

महिला क्रिकेट विश्वचषक 2022 साठी भारतीय संघ मिताली राज ही कर्णधार तर , हरमनप्रीत कौर ही उपकर्णधार असणार आहे. स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, दीप्ति शर्मा, ऋचा घोष हि विकेटकीपर राहणार आहे. स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्रकार, मेघा सिंह, रेणुका सिंह ठाकुर, तानिया भाटिया या देखील विकेटकीपर राहणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com