Petrol Diesel Price Today: रशिया- युक्रेन युद्धामुळे देशातील पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला? जाणून घ्या

रशिया आणि युक्रेनमध्ये मागील अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे.
Petrol Diesel Price Today: रशिया- युक्रेन युद्धामुळे देशातील पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला? जाणून घ्या
Petrol Diesel Price Today: रशिया- युक्रेन युद्धामुळे देशातील पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला? जाणून घ्याSaam Tv
Published On

रशिया आणि युक्रेनमध्ये मागील अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. मात्र, भारतामध्ये (India) पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल झाला नाही. शुक्रवारी सकाळी जाहीर झालेल्या किमतींनुसार आजही तेलाचे दर स्थिर आहेत. मागील अनेक महिन्यांपासून सर्व महानगरांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे दर बदले नाहीत. दोन्ही देशांमधील युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर येऊन पोहोचले असले, तरी त्याचा भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या (Diesel) किमतींवर सध्या तरी कोणताही परिणाम झाला नाही. (Russia Ukraine war raises petrol diesel prices)

हे देखील पहा-

IOCL नुसार मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) आज १ लिटर पेट्रोलची किंमत ९५.४१ रुपये आहे, तर डिझेल ८६.६७ रुपयांना विकले जात आहे. आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) विषयी सांगायचे झाले तर येथे १ लिटर पेट्रोल १०९.९८ रुपयांना मिळत आहे. तर त्याचवेळी डिझेल ९४.१४ रुपयांना विकले जात आहे. याशिवाय कोलकाता (Kolkata), पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपयांना विकले जात आहे. त्याचवेळी, चेन्नईमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. येथे १ लिटर पेट्रोल १०१.४० रुपयांना आणि डिझेल ९१.४३ रुपयांना मिळत आहे.

Petrol Diesel Price Today: रशिया- युक्रेन युद्धामुळे देशातील पेट्रोल- डिझेलचे दर गगनाला? जाणून घ्या
Crime: अहमदनगर हादरले! बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

आपल्या महानगरांमध्ये पेट्रोल- डिझेलचे दर जाणून घेऊया

शहराचे नाव पेट्रोल डिझेल

दिल्ली- ९५.४१ / ८६.३७

मुंबई- १०९.९८ / ९४.१४

कोलकाता- १०४.६७ / ८९.७९

चेन्नई- १०१.४०/ ९१.४३

कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी उच्चांकावर-

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. मागील अनेक दिवसांपासून कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १०० डॉलरच्या पुढे जात होती, तर बुधवारी त्याची किंमत प्रति बॅरल ११० डॉलरवर पोहोचली होती. गेल्या ७ वर्षांतील ही सर्वोच्च किंमत आहे. ५ राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर भारतातही पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात, असे मानले जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com