भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी युट्यूब चॅनेलवर बोलताना त्यांनी एमएस धोनीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की, एमएस धोनी युवराज सिंगच्या करिअरची वाट लावली. दरम्यान आता ते अर्जुन तेंडुलकरवर केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
युवराज सिंगने भारतीय संघाला आयसीसी टी-२० वर्ल्डकप आणि आयसीसी वनडे वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. युवराज सिंगला घडवण्यात योगराज सिंग यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. युवराज सिंग योगराज सिंग यांच्या तालमीत घडलेला खेळाडू आहे. काही महिन्यांपूर्वी अर्जुन तेंडुलकरही योगराज सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेताना दिसून आला होता. योगराज सिंग यांनी युट्यूब चॅनेलवरील चर्चा सत्रात सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना अर्जुन तेंडुलकरच्या भविष्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की,'तुम्ही कोळशाच्या खाणीत हिरा पाहिला असेल ना? तो कोळसाच आहे.'
तसेच ते पुढे म्हणाले की,' हा खदानीतून काढलेला दगड आहे. मात्र तो जर योग्य हातात गेला, तर तोच कोहिनूर बनू शकतो. मात्र तो जर चुकीच्या हातात गेला, ज्याला त्याची किंमत नाही, तर त्याची किंमत राहणार नाही. '
एका मुलाखतीत बोलताना त्यांनी म्हटलं होतं की, 'मी एमएस धोनीला कधीच माफ करणार नाही. त्याने माझ्या मुलाच्या करिअरची वाट लावली. तो आणखी ५-६ वर्ष सहज खेळू शकला असता. पुन्हा युवराज सिंगसारखा खेळाडू होणं कठीण आहे, असं वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर म्हणाले आहेत. कॅन्सर असूनही तो देशासाठी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. त्याला भारतरत्न मिळायलाच हवं. '
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.