आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर अनेक दिग्गज खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. ज्यात ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरचा देखील समावेश होता. निवृत्तीची घोषणा करताना त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्याचे संकेत दिले होते. मात्र ऑस्ट्रेलिया संघाचा मुख्य निवडकर्ता जॉर्ज बेलीने वॉर्नरच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. बेलीने दिलेल्या माहितीनुसार, डेव्हिड वॉर्नर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसून येणार नाही.
टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही डेव्हिड वॉर्नरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा ठरली. ही स्पर्धा झाल्यानंतर त्याने निवृ्त्तीची घोषणा केली होती. त्यानंतर ८ जुलै रोजी त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत निवृत्तीची खात्री करुन देणारी पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा खेळण्यासाठी तयार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे वॉर्नर चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक करतो की काय? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. दरम्यान मुख्य निवडकर्ते जॉर्ज बेलीने, डेव्हिड वॉर्नर कमबॅक करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
डेव्हिड वॉर्नरबद्दल बोलताना जॉर्ज बेली म्हणाला की,' डेव्हिड वॉर्नर केव्हा मस्करी करतोय हे कोणीच सांगु शकत नाही. मात्र त्याने संपूर्ण प्रक्रियेला हलवून टाकण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत शानदार कामगिरी केली आहे. जसजसा वेळ जाईल, तशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटला त्याने दिलेल्या योगदानाची जाणीव होत राहिल. तो एक दिग्गज खेळाडू आहे.'
टी-२० वर्ल्डकपनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ स्कॉटलंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली आहे.
मिचेल मार्श (कर्णधार), शॉन अबॉट, अॅलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, नाथन एलिस, जेक फ्रेजर मॅकगर्क, आरोन हार्डी, जोश हेजलवुड, जोश इंग्लिश, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.