वेस्टइंडिज आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत वेस्टइंडिजने इंग्लंडला २-१ ने धूळ चारली. या सामन्यादरम्यान वेस्टइंडिजचा गोलंदाज अल्जारी जोसेफ आणि कर्णधार शाई होप यांच्यात बाचाबाची झाली.
त्यामुळे अल्जारी जोसेफ मैदान सोडताना दिसून आला. त्यामुळे आता क्रिकेट वेस्टइंडिजने त्याच्यावर मोठी कारवाई केली आहे. पुढील २ सामन्यासाठी त्याच्यावर बॅन लावण्यात आला आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
तर झाले असे की, वेस्टइंडिजची गोलंदाजी सुरू असताना जोसेफ चौथे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. हे षटक सुरू होण्यापूर्वीच तो नाराज होता. त्याला कर्णधाराने हवं तसं क्षेत्ररक्षण सजवून दिलं नव्हतं.
मात्र तरी त्याने चेंडू टाकला आणि विकेट मिळवली. विकेट मिळवल्यानंतर गोलंदाज जल्लोष करतात. मात्र तो जल्लोष न करता जोसेफ मैदानाच्या बाहेर निघून गेला. जाण्यापूर्वी तो शाई होपला काहीतरी बोलताना दिसून आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
ही घटना झाल्यानंतर संघाचा मु्ख्य प्रशिक्षक डॅरीन सॅमीने देखील संताप व्यक्त केला. सॅमी म्हणाला, ' माझ्या मैदानावर अशी वागणूक अमान्य आहे. आपण मित्र आहोत, पण अशाप्रकारते वर्तण मान्य नाही. त्याबद्दल आपण नक्कीच बोलू.'|
हा सामना झाल्यानंतरक जोसेफने संघाचा कर्णधार जोसेफ आणि संघातील इतर खेळाडंची माफी मागितली. तो सामन्यानंतर बोलताना म्हणाला की, 'मी वैयक्तिकरित्या संघातील खेळाडू आणि कर्णधार शाई होपची माफी मागितली आहे. मी वेस्टइंडिजच्या फॅन्सची माफी मागतो. मला माहीत आहे की,चूक छोटी आहे पण गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.' या चुकीमुळे त्याच्यावर २ सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.