ऑलिम्पिक चॅम्पियन मेडलचा बाईट का घेतात? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी

ऑलिम्पिक ही स्पर्धा खेळांमध्ये अतिशय प्राचीन समजली जाते. त्याची सुरुवात अशा काळात झाली जेव्हा खेळाडू फक्त नावासाठी खेळायचे.
ऑलिम्पिक चॅम्पियन मेडलचा बाईट का घेतात? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी
ऑलिम्पिक चॅम्पियन मेडलचा बाईट का घेतात? जाणून घ्या या मागची रंजक कहाणीSaam TV
Published On

ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर खेळाडू दातांखाली पदक धरताना पाहायला मिळताता. हे फोटो आता आपल्यासाठी सामान्य झाले आहेत. ते करण्याची परंपराच आहे म्हणा. तसं करण्याचे ऑलिम्पिकमधील सुरुवात खूपच मनोरंजक आहे. जवळपास सगळेच खेळाडू आपल्याला हे करताना दिसतात. परंतु ही परंपरा कशी सुरू झाली हे अनेकांना माहित नाही. जाणून घ्या, पदक दाताखाली धरण्याते कारण काय?

याचे कारण जाणून घेण्याआधी प्रथम आपण पदकाचा इतिहास समजून घेऊ.

ऑलिम्पिक ही स्पर्धा खेळांमध्ये अतिशय प्राचीन समजली जाते. त्याची सुरुवात अशा काळात झाली जेव्हा खेळाडू फक्त नावासाठी खेळायचे. तेव्हा ना रौप्य पदक होते ना सुवर्ण पदक. 1896 मध्ये अथेन्समध्ये खरोखरच आधुनिक ऑलिम्पिक (Olympics) खेळ सुरू झाला. त्यानंतर फक्त रौप्य आणि कांस्य पदके देण्यात आले होते. सुवर्णपदकाचा ट्रेंड 1904 पासून सुरू झाला. हे सुवर्णपदक (Gold Medal) ठोस होते आणि इतर दोन पदकांपेक्षा थोडे लहान होते. पदक कसे असेल, त्याचे वजन किती असेल, त्याची रचना कशी असेल, हे सर्व सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ठरवते.

आता जाणून घ्या की खेळाडू पदक दाताखाली का धरतात

स्पोर्ट्सकीडामधील एका अहवालात असे म्हटले आहे की पदक दाताखाली धरण्याचे खरे कारण त्याची चाचणी होती. ते दाताखाली धरुन चावून त्यात भेसळ तर नाही ना, याची तपासणी करण्यात येत असे. हे विशेष म्हणजे सोन्यापासून बनवल्या जाणाऱ्या पदकांसाठी केले जात असे कारण त्यावेळी दोन तीन धातू मिक्स करुन पदक बनवले जात असत. त्यावेळी पदकाच्या उजव्या बाजूने चावले असता असे दिसून आले की पदकामध्ये शिशासारख्या धातूचा वापर भेसळ म्हणून केल्याचे स्पष्ट झाले. अधिक चांगले पदक हे कठीण असते आणि ते चावले तरी आपला मुळ गुणधर्म सोडत नाही.

ऑलिम्पिक चॅम्पियन मेडलचा बाईट का घेतात? जाणून घ्या या मागची रंजक कहाणी
सौरव गांगुलीला Omicron ची लागण? नुकतीच झाली होती 'अँजिओप्लास्टी'

खेळाडू असे का करतात?

त्याचा संबंध फोटोग्राफीशी आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर फोटोग्राफर खेळाडूंना पोझ देण्यास सांगतात. पण बहुतेक खेळाडू मेडल हातात धरून हसत हसत फोटो काढायचे. फोटोग्राफर त्याला वेळोवेळी पोज बदलण्यास सांगायचे, पण आजूबाजूला पोझ देण्यासारखे काहीच नसल्याने तेच फोटो समोर आले. त्यानंतरच पदक दाताने चावण्याची परंपरा सुरू झाली, त्यामागे फोटोंमध्ये काही वेगळेपण आणणे एवढाच हेतू होता. अशा प्रकारे पदक दाताखाली धरण्याची परंपरा सुरू झाली जी आजही सुरू आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com