Team India News: टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडिया बदलणार! कोण होणार नवा कर्णधार? हे आहेत पर्याय

Team India New Captain: आयसीसी टी -२० वर्ल्डकपनंतर रोहित शर्माने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Team India News: टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडिया बदलणार! कोण होणार नवा कर्णधार? हे आहेत पर्याय
rohit sharmatwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेसह एका पर्वाचा अंत झाला आहे. भारतीय संघाने वर्ल्डकप जिंकला म्हणून जगभरात जल्लोष केला जात आहे. तर काही वाईट बातम्या समोर आल्या आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यापुढे भारतीय संघाकडून टी -२० क्रिकेट खेळताना दिसून येणार नाहीत. राहुल द्रविड देखील भारतीय संघाला प्रशिक्षण देताना दिसून येणार नाही.ही स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

भारतीय संघाला मिळणार नवा प्रशिक्षक अन् कर्णधार

भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप जिंकताच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यामुळे यापुढे दोघेही भारतीय संघाकडून टी -२० क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही. या स्पर्धेत रोहित शर्मा भारताचा कर्णधार म्हणून खेळत होता. मात्र टी -२०क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता भारतीय संघाला नवा कर्णधार मिळणार आहे.

Team India News: टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडिया बदलणार! कोण होणार नवा कर्णधार? हे आहेत पर्याय
IND vs SA, Final: जय शहांची भविष्यवाणी खरी ठरली! रोहित अन् हार्दिकने बारबाडोसमध्ये रोवला तिरंगा; VIDEO

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून आले होते. तर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी शुभमन गिलची भारतीय कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. रोहित संघात असताना हार्दिक पंड्याने उपकर्णधाराची भूमिका पार पाडली होती. मात्र आता रोहितने कर्णधारपद सोडल्यानंतर टीम मॅनेजमेंट ही जबाबदारी कोणावर सोपवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Team India News: टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडिया बदलणार! कोण होणार नवा कर्णधार? हे आहेत पर्याय
Virat Kohli Dance: हे नाही पाहिलं तर काय पाहिलं..WC विजयानंतर विराटचा अर्शदीप सिंगसोबत भागंडा डान्स- video

भारतीय संघाच्या विजयात विराट कोहलीचे मोलाचे योगदान आहे. भारतीय क्रिकेटला एका उंचीवर घेऊन जाणार विराटने तितकंच मोठं योगदान दिलं आहे. मात्र आता तो टी-२० क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही. त्याच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर कोणाला संधी मिळणार हे पाहणं ही महत्वाचं ठरणार आहे.

राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा हा वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर संपला होता. मात्र त्यांना टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपर्यंत थांबवण्यात आलं होतं. ही स्पर्धा त्यांच्यासाठी मुख्यप्रशिक्षक म्हणून शेवटची स्पर्धा होती. भारतीय संघाने त्यांना वर्ल्डकप ट्रॉफीसह निरोप दिला आहे. तर पुढील मुख्य प्रशिक्षक पदासाठी गौतम गंभीरचे नाव चर्चेत आहे. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com