Who Is Mayank Yadav: 'सुपरसाॉनिक' मयांक यादव नक्की आहे तरी कोण?

Mayank Yadav News: सोशल मीडियावर आणखी एका युवा वेगवान गोलंदाजाची चर्चा सुरू आहे. जो वेगाच्या बाबतीत उमरान मलिकलाही मागे सोडतो. कोण आहे मयांक यादव? जाणून घ्या.
who is new speedstar of lucknow super giants mayank yadav news in marathi
who is new speedstar of lucknow super giants mayank yadav news in marathi saam tv news

Who Is Mayank Yadav:

आयपीएल स्पर्धेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अनेक स्टार खेळाडू दिले आहेत. ज्यात हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या स्पर्धेतील प्रत्येक हंगामातून असा एक खेळाडू बाहेर येतो, जो पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवतो. उमरान मालिकलाही आयपीएल स्पर्धेतून संधी मिळाली आणि त्याने संधीचं सोनं करून दाखवलं होतं. आता आणखी एका युवा वेगवान गोलंदाजाची चर्चा सुरू आहे. जो वेगाच्या बाबतीत उमरान मलिकलाही मागे सोडतो.

वेगाचा नवा बादशाह..

शनिवारी(३० मार्च) पार पडलेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात मयांक यादवला पदार्पण करण्याची संधी मिळाली. या सामन्यात रॉकेट स्पीडने गोलंदाजी करत त्याने सर्वांचंच लक्ष वेधलं. त्याने टाकलेला एकही चेंडू हा १४० पेक्षा कमी नव्हता. आपल्या वैयक्तिक दुसऱ्याच षटकातील पहिला चेंडू त्याने ताशी १५५.८ च्या गतीने टाकला. हा आयपीएल २०२४ स्पर्धेतील सर्वात जलद चेंडू ठरला आहे.

who is new speedstar of lucknow super giants mayank yadav news in marathi
IPL 2024, GT vs SRH: अहमदाबादमध्ये गुजरात- हैदाराबाद आमने- सामने! कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११?

मयांक यादव आहे तरी कोण?

देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळणाऱ्या २१ वर्षीय मयांक यादवने देशांतर्गत स्पर्धांमध्येही राडा केला आहे. त्याला २०२१ मध्ये झालेल्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याच्या नावे लिस्ट ए क्रिकेटमध्ये १७ सामन्यांमध्ये ३४ तर १० टी -२० सामन्यांमध्ये १२ गडी बाद करण्याची नोंद आहे. आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत आपल्या संघात स्थान दिले होते.

who is new speedstar of lucknow super giants mayank yadav news in marathi
CSK vs DC, IPL 2024: गुरु की शिष्य; कोण मारणार बाजी? कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकअखेर १९९ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्जलाही चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र शेवट गोड करता आला नाही. पंजाब किंग्ज संघाला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com