Who Is Hasan Mahmud: टीम इंडियाला तासभरात बॅकफूटवर ढकललं, हसन महमूद आहे तरी कोण?

IND vs BAN, 1st Test: बांगलादेशच्या युवा गोलंदाजाने भारताच्या सुरुवातीच्या ३ फलंदाजांना बाद करत माघारी धाडलं आहे.
Who Is Hasan Mahmud: टीम इंडियाला तासभरात बॅकफूटवर ढकललं,  हसन महमूद आहे तरी कोण?
hasan mahmudtwitter
Published On

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिमयवर सुरु आहे. या सामन्यात पाहुण्या बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेचतला आहे.

तर यजमान भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला बांगलादेशच्या युवा गोलंदाजाने मोठे धक्के दिले. हा गोलंदाज नक्की आहे तरी कोण?

बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या सामन्यात भारतीय संघ चांगली सुरुवात करणार असं वाटलं होतं. मात्र २४ वर्षीय हसन महमूदने भारतीय संघाचा खेळ बिघडवला. त्याने एका पाठोपाठ भारतीय संघाला ३ मोठे धक्के दिले. त्यानंतर भारतीय संघाचा डाव सांभाळणाऱ्या रिषभ पंतलाही बाहेरचा रस्ता दाखवला.

भारतीय संघाचा टॉप ऑर्डर कोसळला

या सामन्यात नाणेफेक गमावून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी यावं लागलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली. असं वाटलं होतं की, ही जोडी भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन देणार. मात्र अवघ्या १४ धावांवर भारताला पहिला धक्का बसला.

Who Is Hasan Mahmud: टीम इंडियाला तासभरात बॅकफूटवर ढकललं,  हसन महमूद आहे तरी कोण?
IND vs BAN: बांगलादेशाने जिंकला टॉस, भारत करणार फलंदाजी; चेन्नईचं पीच कोणाला ठरणार फायदेशीर?

हसन महमूदच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलला तर खाते ही उघडता आलं नाही. गिल शून्यावर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीच्या रुपात भारताला तिसरा धक्का बसला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत यांनी मिळून भारतीय संघाचा डाव सांभाळला. दोघांनी मिळून अर्धशतकी भागीदारी केली. मात्र लंच ब्रेकनंतर सुरुवातीलाच हसन महमूदने रिषभ पंतलाही बाद करत माघारी धाडलं.

Who Is Hasan Mahmud: टीम इंडियाला तासभरात बॅकफूटवर ढकललं,  हसन महमूद आहे तरी कोण?
IND vs BAN: केएल राहुलचं कसोटी संघात कमबॅक कसं झालं? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

कोण आहे हसन महमूद?

हसन महमूद हा बांगलादेशचा २४ वर्षीय वेगवान गोलंदाज आहे. पहिल्याच कसोटी तो भारतीय फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला आहे. या सामन्यात त्याने सुरुवातीच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. त्याला २०२० मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय आणि २०२१ मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. दरम्यान त्याला आतापर्यंत बांगलादेशसाठी ३ कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com