Impact Player Rule: 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणजे नेमके काय? कधी करता येणार वापर? समजून घ्या सोप्या शब्दात..

What Is Impact Player: काय आहे इम्पॅक्ट प्लेअरचा नियम? समजून घ्या.
IPL Impact Rule
IPL Impact RuleSaam Tv
Published On

IPL Impact Player Rule: आजपासून आयपीएल २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स आणि एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तब्बल ४ वर्षानंतर प्रत्येक संघाला आपल्या होम ग्राऊंडवर सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.

तसेच काही नवे नियम देखील लागू केले जाणार आहेत. त्यापैकीच एक नियम म्हणजे इम्पॅक्ट प्लेअर. काय आहे इम्पॅक्ट प्लेअरचा नियम? समजून घ्या.

IPL Impact Rule
Young Players In IPL: IPL 2023 स्पर्धेत 'हे' 10 युवा खेळाडू घालणार धुमाकूळ ! एक तर ख्रिस गेलला देतोय टक्कर

या हंगामात पहिल्यांदाच इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू केला जाणार आहे. यापूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत देखील या नियमाचा वापर केला गेला होता. या नियमानुसार आता ११ नव्हे तर १२ खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत.

इम्पॅक्ट प्लेअरचा नियम काय सांगतो?

या नियमानुसार आता ११ ऐवजी १२ खेळाडू खेळताना दिसून येणार आहेत. सामना सुरु असताना कुठल्याही खेळाडूला बाहेर करता येणार तसेच त्याच्या ऐवजी दुसऱ्या खेळाडूला संधी देता येणार आहे.

यासाठी दोन्ही संघातील कर्णधारांना नाणेफेक होण्यापूर्वी ५-५ खेळाडूंची यादी द्यावी लागणार आहे. कर्णधाराने निवडलेल्या या खेळाडूंपैकी एका खेळाडूचा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करता येणार आहे.

या खेळाडूचा वापर फलंदाजी आणि गोलंदाजी कारण्यासाठी केला जाणार आहे. हा १२ वा खेळाडू मैदानात येऊन सामन्याचे चित्र बदलू शकतो. (Latest sports updates)

IPL Impact Rule
Young Players In IPL: IPL 2023 स्पर्धेत 'हे' 10 युवा खेळाडू घालणार धुमाकूळ ! एक तर ख्रिस गेलला देतोय टक्कर

इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केव्हा करू शकणार?

सर्व संघ १४ वे षटक सुरु होण्यापूर्वी इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करू शकणार आहेत. विकेट पडल्यानंतर, षटक संपल्यानंतर किंवा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जाणार आहे.

संघ केव्हा करणार इम्पॅक्ट प्लेअरचा वापर?

जर एखाद्या संघाला वाटत असेल की,त्यांचा गोलंदाज अंतिम षटकांमध्ये गोलंदाजी करण्यासाठी संघर्ष करत असेल त्यावेळी ते इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करू शकतात. तसेच एखाद्या संघाला शेवटच्या षटकांमध्ये मोठे फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची गरज असेल, अशावेळी देखील ते इम्पॅक्ट प्लेअरचा वापर करू शकतात.

इम्पॅक्ट प्लेअर म्हणून परदेशी खेळाडूला संधी मिळणार का?

आयपीएल स्पर्धेत केवळ ४ परदेशी खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये खेळवण्याची अनुमती दिली जाते. आता इम्पॅक्ट प्लेअरचा नियम लागू केल्यानंतरही केवळ ४ परदेशी खेळाडूंना प्लेइंग ११ मध्ये खेळण्याची अनुमती दिली जाणार आहे. जर प्लेइंग ११ मध्ये ३ परदेशी खेळाडू असतील तर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चौथ्या परदेशी खेळाडूला संधी दिली जाऊ शकते

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com