रोहित शर्माचं कर्णधारपद धोक्यात ? भारताच्या माजी क्रिकेटपटूनं केलं मोठ वक्तव्य

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने (Virender Sehwag) कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) मोठं वक्तव्य केलं आहे.
Rohit Sharma
Rohit Sharma saam Tv
Published On

नवी दिल्ली : टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने (Virender Sehwag) कर्णधार रोहित शर्मावर (Rohit Sharma) मोठं वक्तव्य केलं आहे. रोहित शर्माला टी-२० च्या कर्णधारपदावरून विश्रांती दिली जाऊ शकते. रोहितला विश्रांती दिल्यास कामाचा भार व्यवस्थितरित्या सांभाळू शकतो, असे मत माजी क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने व्यक्त केले. रोहित कर्णधार झाल्यावर दुखापतीमुळे आणि कामाच्या ताणामुळे अधिक सामने खेळू शकला नव्हता. ( Rohit Sharma Latest News In Marathi )

Rohit Sharma
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी बातमी; वर्ल्डकप विजेता कर्णधार घेणार संन्यास

माजी क्रिकेटपूट विरेंद्र सहवागने नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत सहवागने रोहित शर्मावर भाष्य केलं. सहवाग म्हणाला, 'भारतीय संघ व्यवस्थापनाच्या मनात टी-२० सामन्यात कर्णधारपदी इतर कोणाचा नाव असेल तर, रोहितला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले जाऊ शकते. यामुळे रोहित हा कामाच्या भाराचे व्यवस्थापन आणि मानसिक थकवा योग्यरित्या हाताळत त्याच्या वयामानानुसार चांगला खेळू शकतो'.

Rohit Sharma
भारताने केला पहिल्या T20 मध्ये आयर्लंडचा ७ विकेट्सने पराभव

सहवागने पुढे म्हणाला, 'टी-२० फॉरमॅटमध्ये रोहितची कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यास तो एक दिवसीय सामन्यात चांगल्याप्रकारे खेळू शकतो'. विरेंद्र सहवागनं पुढे म्हटले की, भारतीय संघ व्यवस्थापनाला तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार हवा असेल, तर रोहित शर्मा एक चांगला पर्याय आहे'. पुढे सहवाग म्हणाला, 'भारताजवळ टी-२० फॉरमॅटसाठी अनेक आक्रमक फलंदाज आहेत. त्यातील रोहित शर्मा, ईशान किशन आणि केएल राहुल हे खेळाडूंचं सर्वात आधी घेईल. रोहित आणि ईशान हे दोघेही एकत्र चांगले खेळतात. त्या दोघांची जोडी टी-२० फॉरमॅटमध्ये चांगले खेळाडू म्हणून सिद्ध होईल'. विरेंद्र सहवागने यावेळी गोलंदाज उमरान मलिक याचीही प्रशंसा केली. सहवाग म्हणाला, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यासारखी आक्रमक गोलंदाजी मलिक देखील करू शकेल'. उमरानने रविवारी आयरलँडच्या विरुद्ध टी-२० सामन्यातून आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com