Coromandel Express Train Accident: ओडिशा रेल्वे अपघाताने विराटही भावुक, ट्वीट करत व्यक्त केल्या भावना

Virat Kohli Tweet On Train Accident: लंडनमध्ये असलेल्या विराट कोहलीने ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे.
Virat kohli
Virat kohli saam tv
Published On

Virat Kohli Tweet On Coromandel Express Train Accident: ओडिशामधील बालासोरमध्ये शुक्रवारी (२ जून) रात्री भीषण रेल्वे अपघात घडला आहे. या रेल्वे अपघातामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भीषण अपघातात २ एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांमध्ये धडकली आहे.

या अपघातात २६१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ९०० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी आहेत. हा आतपर्यंतचा जगातील सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान लंडनमध्ये असलेल्या विराट कोहलीने ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे.

Virat kohli
Naveen Ul Haq On Virat Kohli: गंभीरला Legend म्हणत नवीनने विराट बाबत केलं मोठं वक्तव्य

भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये आहे. येत्या ७ ते ११ जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू कसून सराव करण्यात व्यस्त आहेत. दरम्यान विराट कोहलीने ओडिशा रेल्वे अपघातात मृत्यू आणि जखमी झालेल्या प्रवाशांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

विराट कोहलीने आपल्या ट्विट मध्ये लिहिले की, 'ओडिशातील भीषण रेल्वे अपघाताबद्दल ऐकून खूप वाईट वाटलं. ज्या कुटुंबांनी त्यांच्या जवळच्या व्यक्ती गमावल्या त्यांच्याप्रती मी सहवेदना व्यक्त करतो आणि जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो..' विराट कोहलीसह माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मणने देखील ट्विट करत दुःख व्यक्त केलं आहे. (Latest sports updates)

या अपघाताबद्दल सांगायचं झालं तर, या अपघातात शालिमार - चेन्नईन सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस, बंगळुरू - हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि मालवाहू रेल्वे यांची जोरदार धडक झाली. हा अपघात झाल्यानंतर बचाव कार्य सुरु आहे. तसेच या परिसरातील रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना १० लाख रूपये तर गंभीर जखमी झालेल्यांना २ लाख तर किरकोळ जखमी व्यक्तींसाठी ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com