Indian Players Will Play Duleep Trophy 2024: भारतीय खेळाडू सध्या विश्रांतीवर आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-० ने बाजी मारली होती. तर वनडे मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला. दर ४० दिवस ब्रेकवर असलेल्या भारतीय खेळाडूंन दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. संघ निवड करणं सोपं जावं म्हणून बीसीसीआयची अशी इच्छा आहे की, भारतीय खेळाडूंनी दुलीप ट्रॉफी खेळावी.
भारतीय संघातील खेळाडू अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, केएल राहुल,सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनाही दुलीप ट्रॉफी खेळण्यास सांगण्यात आलं आहे, असं म्हटलं जात आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसुद्धा (Virat Kohli) या स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात. जसप्रीत बुमराहला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार की नाही? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे त्याचं दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणं कठीण दिसून येत आहे.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर हे सामने २४ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत. तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर या मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. अजित आगरकरांच्या अक्ष्यक्षतेखालील निवड समिती, अ,ब,क आणि ड संघांची निवड करणार आहे.
आगामी दुलीप ट्रॉफीसाठी बीसीसीआय इशान किशनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. इशान किशन आणि श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार दिल्यामुळे त्यांची केंद्रीय करारातून सुट्टी करण्यात आली होती. मात्र हे खेळाडू आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात.
श्रेयस अय्यरला भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेत कमबॅक करण्याची संधी मिळाली. तर इशान किशनला भारतीय संघात कमबॅक करायचं असेल, तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेतू चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
तसेच भारतीय संघातील अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची दुलीप ट्रॉफीसाठी निवड केली जाणार नाहीये, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोघांचेही भारतीय संघात कमबॅक करण्याचे दार जवळजवळ बंद झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.