Virat Kohli Run Out: चीते की चाल, बाज की नजर! २० मीटर धावत विराटचा रॉकेट थ्रो; फलंदाज बाद- Video

Virat Kohli Run Out, PBKS vs RCB IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आण पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विराटने शशांक सिंगला धावबाद केलं आहे.
Virat Kohli Run Out:  चीते की चाल, बाज की नजर! २० मीटर धावत विराटचा रॉकेट थ्रो; फलंदाज बाद- Video
Virat kohli rocket throw run out shashank singh in pbks vs rcb match watch video amd2000twitter
Published On

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ५८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात विराट कोहलीच्या फलंदाजीची आणि उत्कृष्ठ क्षेत्ररक्षणाचा जादू पाहायला मिळाली. पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने ४७ चेंडूंचा सामना करत ९२ धावांची खेळी केली. त्यानंतर क्षेत्ररक्षण करताना त्याने रॉकेट थ्रो करत शशांक सिंगला पॅव्हेलियनची वाट दाखवली. या सामन्यातील १४ व्या षटकात शशांक सिंगने २ धावा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र विराट कोहलीची थ्रो मुळे त्याला आपली विकेट गमवावी लागली.

तर झाले असे की, २४२ धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघ देखील मजबूत स्थितीत होता. पंजाबची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु होती. त्यावेळी शशांक सिंग आणि सॅम करन किल्ला लढवत होते. विराट कोहली सीमीरेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. फलंदाजी करत असलेल्या सॅम करनने हलक्या हाताने शॉट खेळला.

Virat Kohli Run Out:  चीते की चाल, बाज की नजर! २० मीटर धावत विराटचा रॉकेट थ्रो; फलंदाज बाद- Video
SRH vs LSG, IPL 2024: लखनऊचे मालक लाईव्ह सामन्यात केएल राहुलवर भडकले; Video तुफान व्हायरल

त्यावेळी विराट सीमारेषेवरुन कमीत कमी २० मीटर अंतर धावत पूर्ण करत आला. ३० यार्ड सर्कलमध्ये एन्ट्री करताच त्याने चेंडू उचलला आणि थेट स्टम्पच्या दिशेने रॉकेट थ्रो केला. दुसरी धाव पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शशांक सिंगने क्रिझमध्ये पोहचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र तो क्रिझमध्ये पोहचू शकला नाही. पंजाब ज्या स्थितीत होत, तिथून विजय स्पष्ट दिसत होता. शशांक सिंग आणि सॅम करन दोघेही संघाला विजयाच्या जवळ घेऊन जात होते. मात्र नेमकं त्याचवेळी तो बाद झाला.

Virat Kohli Run Out:  चीते की चाल, बाज की नजर! २० मीटर धावत विराटचा रॉकेट थ्रो; फलंदाज बाद- Video
IPL 2024 SRH vs LSG: पुरन-बिदोनीची नाबाद खेळी; हैदराबादच्या संघासमोर १६६ धावांचे आव्हान

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर २४२ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर आलेल्या पंजाब किंग्ज संघाला अवघ्या १८१ धावा करता आल्या. या सामन्यात सॅम करनने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून विराट कोहलीने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली.

तर रजत पाटीदारने ५५ आणि कॅमेरुन ग्रीने ४६ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाने २४१ धावांपर्यंत मजल मारली. तर या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून रिले रुसोने अर्धशतकी खेळी केली. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com