Virat Kohli Instagram Post: मैदानानंतर इंस्टाग्रामवरही विराटची हवा! वर्ल्डकप विनिंग पोस्टने मोडले सर्व रेकॉर्ड

Likes On Virat Kohli Instagram Post: विराट कोहलीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टने सर्व रेकॉर्ड मोडून काढले आहेत.
Virat Kohli Instagram Post: मैदानानंतर इंस्टाग्रामवरही विराटची हवा! वर्ल्डकप विनिंग पोस्टने मोडले सर्व रेकॉर्ड
virat kohli instagram postinstagram

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलचा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी शानदार विजय मिळवला. यासह दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर नाव कोरलं. या विजयानंतर क्रिकेट फॅन्स आणि खेळाडूंकडून जोरदार जल्लोष करण्यात आला. दरम्यान मैदानाबाहेर इंस्टाग्रामवरही विराट कोहलीने इतिहास रचला आहे.

भारतीय संघाच्या विजयानंतर सोशल मीडियावर भारतीय संघाचीच हवा होती. जिकडे तिकडे भारतीय संघाचे स्टेटस आणि पोस्ट दिसत होते. विराट कोहलीनेही भारतीय संघाच्या विजयाची पोस्ट शेअर केली आणि ही पोस्ट विजेच्या वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाली. पोस्ट अपलोड होताच नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला. दरम्यान या पोस्टने सारेच रेकॉर्ड मोडून कढले आहेत.

विराटने रचला इतिहास

विराटने इंस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट आशियातील सर्वाधिक लाईक केलेली पोस्ट ठरली आहे. विराटने टाकलेल्या या पोस्टला १८ मिलियनहून अधिक लाईक्स आहेत. यासह त्याने सर्वाधिक लाईक्सच्या बाबतीत कियारा आडवाणीच्या लग्नाची घोषणा करण्याच्या पोस्टला मागे सोडलं आहे. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी शेअर केलेल्या या पोस्टवर १६.२६ मिलियनपेक्षा अधिक लाईक्स होते.

Virat Kohli Instagram Post: मैदानानंतर इंस्टाग्रामवरही विराटची हवा! वर्ल्डकप विनिंग पोस्टने मोडले सर्व रेकॉर्ड
IND vs SA, Final: कर्णधार असावा तर असा! रोहितने घेतलेल्या या 3 मोठ्या निर्णयांनी टीम इंडियाला बनवलं चॅम्पियन

विराटने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप उंचावत असल्याचा फोटो शेअर केला होता. ज्यावर त्याने कॅप्शन म्हणून,'याहून चांगला दिवस मी स्वप्नातही पाहू शकलो नसतो. देव महान आहे. आम्ही करुन दाखवलं, जय हिंद.' असं लिहिलं आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Virat Kohli Instagram Post: मैदानानंतर इंस्टाग्रामवरही विराटची हवा! वर्ल्डकप विनिंग पोस्टने मोडले सर्व रेकॉर्ड
IND vs SA, Final: जय शहांची भविष्यवाणी खरी ठरली! रोहित अन् हार्दिकने बारबाडोसमध्ये रोवला तिरंगा; VIDEO

भारताचा विजय अन् विराटची निवृत्तीची घोषणा

या संपूर्ण स्पर्धेत विराट कोहली सुपरफ्लॉप ठरला होता. शेवटी फायनलच्या सामन्यात भारतीय संघाला गरज असताना विराटने ७६ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने १७६ धावांपर्यंत मजल मारली. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयापासून ७ धावा दुर राहिला. विराट कोहली या सामन्याचा सामनावीर ठरला. दरम्यान हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर विराटने निवृत्त होण्याची घोषणा केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com