Virat Kohli : विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिॲक्टिवेट की सस्पेंड? प्रोफाइल गायब झाल्याने चाहते संभ्रमात

Virat Kohli Instagram Account Deactivate News : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाले आहे. २७४ दशलक्ष फॉलोअर्स असलेले हे अकाउंट सर्चमध्ये न दिसल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
Virat Kohli : विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिॲक्टिवेट की सस्पेंड? प्रोफाइल गायब झाल्याने चाहते संभ्रमात
Virat Kohli Instagram Account Deactivate NewsSaam Tv
Published On
Summary
  • विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाऊंट अचानक गायब

  • २७४ दशलक्ष फॉलोअर्स होते

  • विराट किंवा मेटाकडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण नाही

  • सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये संभ्रम

भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे लाखो चाहत्यांना धक्का बसला आहे. गुरुवार आणि शुक्रवार या दरम्यान हे अकाऊंट दिसत नसल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे. दरम्यान इंस्टाग्रामवर सर्च केले असता विराट कोहलीचे कोणतेही ऑफिशिअल पेज दिसत नसून फॅनपेज पाहायला मिळत आहे.

कोहलीला इंस्टाग्रामवर आतापर्यंत २७४ दशलक्षाहून अधिक लोक फॉलो करतात . हे अकाउंट आता सर्च किंवा फॉलोअर्स लिस्टमध्ये दिसत नाही. आता या अकाउंटसाठी सर्च केल्यास "हे पेज उपलब्ध नाही" असा संदेश मिळतो. एवढेच नाही तर सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की विराटसोबत त्याचा भाऊ विकास कोहलीचे अकाउंट देखील दिसतं नसल्याचं म्हटलं जात आहे. सध्या विराट कोहली , त्याची टीम किंवा मेटाकडून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही.

Virat Kohli : विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट डिॲक्टिवेट की सस्पेंड? प्रोफाइल गायब झाल्याने चाहते संभ्रमात
Mumbai Crime : दादरमधील धक्कादायक घटना! बेडरूमच्या बाल्कनीतून उडी मारत महिलेने संपवलं आयुष्य, कारण आलं समोर

दरम्यान, विराटने सोशल मीडिया सोडत असल्याचे किंवा ब्रेक घेत असल्याचे काहीही पोस्ट केलेले नाही, यामुळे आता प्रश्न असे निर्माण होत आहे की विराटने स्वतः आपले अकाउंट बंद केले आहे की? त्याचे अकाउंट सस्पेंड केले गेले आहे?

विराट कोहलीचे अकाऊंट अचानक गायब झाल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. चाहते एक्स (पूर्वीचे ट्विटर) आणि इंस्टाग्रामवर स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com