Virat Kohli: विराट कोहली कायमचा लंडनला शिफ्ट होणार? ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी दुसऱ्याच्या नावावर केली प्रॉपर्टी

Virat Kohli Handed Over His Property To Brother Vikas Kohli: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होण्याआधी विराट कोहलीने आपली प्रॉपर्टी त्याच्या भावाच्या नावावर केली. आता विराट कोहली कायमस्वरुपी भारत सोडून जाणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Virat Kohli Handed Over His Property To Brother Vikas Kohli
virat kohligoogle
Published On

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली १९ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी तो आपल्या गुरुग्राममधील स्थित त्याच्या घरी पोहचला. कोहलीने त्याची गुरुग्राममधील प्रॉपर्टी त्याचा मोठा भाऊ विकास कोहलीच्या नावावर केली आहे. मंगळवारी, कोहली गुरुग्रामधील वझिराबाद तहसील कार्यालयात पोहचला. तिथे गुरुग्राममधील संपूर्ण प्रॉपर्टीचा जनरल पॉवर ऑफ अटॅर्नी विकास कोहलीला हस्तातंरित केली. यानंतर, विराट कोहली कायमस्वरुपी भारत देश सोडून जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

विराट कोहलीने भावाच्या नावावर केली प्रॉपर्टी

विराट कोहली त्याची पत्नी अनुष्का शर्मा, मुलं वामिका आणि अकायसह लंडनमध्ये राहतो. त्यामुळे तो त्याच्या प्रॉपर्टीशी संबधित बाबींवर देखरेख करण्यासाठी वारंवार भारतात येऊ शकत नाही. यासाठी कोहलीने प्रॉपर्टीशी संबधित कायदेशीर अधिकार त्याच्या भावाकडे सोपवले आहे. त्याने जनरल पॉवर ऑफ अॅटर्नी मोठा भाऊ विकास कोहलीकडे सोपवली. जेणेकरुन त्याला प्रॉपर्टीशी संबधित कायदेशीर निर्णय घेण्याचा अधिकार मिळेल.

कोहली १४ ऑक्टोबर रोजी भारतात आला आणि महत्वाच्या कागदपत्रांवर सही करण्यासाठी गुरुग्राममधील तहसील कार्यालयात गेला होता. यावेळी त्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांसोबत फोटोज देखील काढले. कोहलीकडे गुरुग्राममधील डीएलएफ सिटी फेज १ मध्ये एक आलिशान बंगला आहे, जे त्याने २०२१ मध्ये खरेदी केले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बंगल्याची किंमत सुमारे ८० कोटी रुपये आहे. गुरुग्राममध्ये त्याच्याकडे एक आलिशान फ्लॅट देखील आहे. आता हे दोन्ही प्रॉपर्टी त्याचा मोठा भाऊ विकास सांभाळेल .

Virat Kohli Handed Over His Property To Brother Vikas Kohli
WTC Points Table: पाकिस्तानच्या विजयानं भारताचं गणित बिघडलं; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी कोहली रवाना

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली १९ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियालिरुद्ध वनडे सामना खेळताना दिसेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना १९ ऑक्टोबर रोजी पर्थ येथे खेळला जाईल. पुढील दोन सामने अॅडलेड आणि सिडनी येथे खेळवले जातील. दुसरा एकदिवसीय सामना २३ ऑक्टोबर रोजी आणि तिसरा सामना २५ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. त्यानंतर २९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाईल.

Virat Kohli Handed Over His Property To Brother Vikas Kohli
IND vs PAK: भारत- पाकिस्तानी खेळाडूंचं सामन्यापूर्वीच हाय-फाईव्ह, पाकिस्तानसोबतची नो हँडशेक पॉलिसी इथेच संपणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com