Viral Video: कबड्डीचा थरार म्हणतात तो ह्योच, ओव्हरलोडेल रेडरची सरपातळ खेळाडूंनी केलेली ही पकड एकदा पाहाच -VIDEO

Viral Kabaddi Video: एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
viral video
viral videoTwitter

Viral Kabaddi Video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ खदखदून हसवणारे असतात, तर काही व्हिडिओ पाहून आपला प्रेरणा मिळत असते.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

viral video
Ind vs Aus: दुसऱ्या वनडेत रोहितची एन्ट्री होताच 'या' दिग्गज खेळाडूचा होणार पत्ता कट

कबड्डी हा मैदानी खेळ आहे. यात चपळतेसह ताकदीचीही तितकीच गरज असते. मात्र हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाहून तुमचा अंदाज चुकीचा ठरू शकतो. (Latest sports updates)

कारण या व्हिडिओमध्ये सरपातळ खेळाडूंनी चक्क वजनदार खेळाडूची पकड केल्याचे पाहायला मिळाले आहे.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कबड्डीचा सामना सुरु असतो. चढाईपटू चढाई करण्यासाठी सज्ज होतो. तुम्ही पाहू शकता की, बचाव करणारे खेळाडू सरपातळ आहेत.

तर चढाई करणारा ३ नंबरची जर्सी घातलेला खेळाडू भरभक्कम आहे. तरीदेखील या खेळाडूंनी भरभक्कम खेळाडूची यशस्वी पकड केली आहे. हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल आहे.

या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं आहे. तसेच त्या खेळाडूंचं कौतुक देखील केलं जात आहे. या खेळाडूंनी दाखवून दिलं आहे की, कबड्डी हा जितका ताकदीचा खेळ आहे तितकाच बुद्धीचाही खेळ आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com