बुमराह सर्वोत्तम वेगवान गोलंदाज- माजी गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांचे मत

भारताचे माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे कौतुक केले आहे
जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह- Saam TV
Published On

नवी दिल्ली : भारताचे India माजी वेगवान गोलंदाज Bowler वेंकटेश प्रसाद यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह Jaspreet Bumrah याचे कौतुक केले आहे. भारताचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम पाहिलेल्या प्रसाद यांनी यावेळी म्हटले की, ‘माझ्यासाठी बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील Cricket सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. कारण त्याच्या वेगात विविधता आहे, जी त्याच्या यशाची गुरुकिल्ली आहे.’ Venkatesh Prasad Praises Jadpreet Bumrah

ते येथील एका कार्यक्रमात बोलत होते. प्रसाद यांनी नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२० च्‍या दुसऱ्या सत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बंगळूरचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याचेही कौतुक केले.

ते म्हणाले यावेळी म्हणाले की,‘हर्षल आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे, जरी तो सर्वात वेगवान नसला तरी, त्याच्यात विविधता आहे आणि तो खेळ समजून घेण्यास आणि त्याच्या योजना अमलात आणण्यास सक्षम आहे.’

प्रसाद यांनी सध्या चांगली कामगिरी करत असणाऱ्या अन्य संघातील गोलंदाजांचेही कौतुक केले. ‘एनरिक नॉर्खिया आणि कागिसो रबाडा सारखे काही दक्षिण आफ्रिकन गोलंदाज देखील चांगले काम करत आहेत. आणि जोफ्रा आर्चर असा गोलंदाज आहे जो १५० किमी प्रतितासापेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करतो परंतु, तरीही त्याची लय सोडत नाही.’ Venkatesh Prasad Praises Jadpreet Bumrah

भारतीय संघ आपल्या ट्वेन्टी-२० विश्वरकरंडकातील मोहिमेची सुरुवात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून करणार आहे. हा बहुचर्चित सामना येत्या २४ ऑक्टोबर रोजी ‘दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडणार आहे. सध्या अमिराती संथ खेळपट्टया चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे गोलंदाजांच्या वेगाला अधिक महत्त्व आलेले आहे. त्यापार्श्वभूमीवर प्रसाद यांची ही टिप्पणी महत्त्वाची समजली जात आहे.

Edited By - Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com