KL Rahul:केएल राहुल IPL मधून ब्रेक घेणार? माजी क्रिकेटपटू स्पष्टच बोलला

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. सतत संधी मिळूनही त्याला संधीचं सोनं करता येत नाहीये
K l rahul in press conference
K l rahul in press conference saam tv
Published On

KL Rahul: भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल सध्या चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. सतत संधी मिळूनही त्याला संधीचं सोनं करता येत नाहीये. नुकताच ऑस्ट्रेलियाविरुध्द झालेल्या पहिल्या २ कसोटी सामन्यांमध्ये देखील त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती.

त्यामुळे चहूबाजूंनी त्याच्यावर टीकेचा वर्षाव केला जातोय. असं असताना आता माजी भारतीय क्रिकेटपटू व्यंकटेश प्रसादने केएल राहुलला मोलाचा सल्ला दिला आहे. (Latest Sports Updates)

व्यंकटेश प्रसाद यांनी ऑस्टेलियाविरुध्दच्या पहिल्या कसोटी सामन्यापासूनच केएल राहुलला टार्गेट करायला सुरुवात केली आहे. केएल राहुल देखील या मालिकेत पूर्णपणे फ्लॉप ठरला आहे.

त्यामुळे व्यंकटेश प्रसाद यांनी म्हटलं होतं की,केएल राहुल फ्लॉप होऊनही त्याला सातत्याने भारतीय संघात संधी दिली जात आहे. त्याच्यामुळे जो खेळाडू त्या ठिकाणी खेळण्यासाठी पात्र आहे, त्या खेळाडूला संधी मिळत नाहीये.

K l rahul in press conference
IND VS AUS 2nd Test:'थँक यु राहुल..'फ्लॉप मशीन KL Rahul ला चाहत्यांनी दिला निरोप; भन्नाट मिम्स होताहेत व्हायरल..

व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विट करत लिहिले की, 'काही लोकांना असं वाटतंय की, केएल राहुल आणि माझ्यात वैयक्तिक वाद आहेत. मात्र असं काहीच नाही. मला देखील वाटतं की त्याने चांगलं खेळावं. मात्र खराब कामगिरी करत असताना त्याचा आत्मविश्वास कधीही वाढणार नाही. त्याच्याकडे आता पुनरागमन करण्याची संधी देखील नाहीये. कारण आता देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा देखील समाप्त झाल्या आहेत.''

तसेच त्यांनी केएल राहुलला सल्ला देत म्हटले की,' केएल राहुलला जर फॉर्ममध्ये परतायचं असेल तर त्याला इंग्लंडमध्ये जाऊन काऊंटी क्रिकेट खेळावं लागेल. ठीक त्याचप्रकारे ज्याप्रकारे चेतेश्वर पुजाराने केले होते. देशासाठी कसोटी क्रिकेट खेळणं आणि पुनरागमन कारण्यासाठी प्रयत्न करणं हे जोरदार प्रत्युत्तर असू शकतं. मात्र यासाठी तो आयपीएल सोडेल का?' असं ट्विटव्यंकटेश प्रसाद यांनी केलं आहे.

K l rahul in press conference
IND VS AUS: शेवटच्या दोन टेस्ट आणि वनडे सीरीजसाठी भारतीय संघ जाहीर, पहिल्या वनडेतून रोहित आऊट

यापूर्वी देखील व्यंकटेश प्रसादने केएल राहुलवर निशाणा साधला होता. त्यांनी म्हटले होते की,'गेल्या २० वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघातील कुठल्याच सलामीवीर फलंदाजाने इतक्या कमी सरासरीने धावा केल्या नाहीये.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com