MI vs UP Highlights : WPL मध्ये मुंबईचा पहिला पराभव; यूपीने ५ गडी राखून मुंबई इंडियन्सला धूळ चारली

यूपी वॉरियर्सने १९.३ षटकात धावांचा पाठलाग करून सामना खिशात टाकला.
MI vs UP Highlights
MI vs UP Highlights wpl/twitter

मुंबई : वुमेन्स प्रीमियर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्समध्ये सामना रंगला. या लीगमध्ये मुंबईने आधीच प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. आजच्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करून यूपीला १२७ धावांचे आव्हान दिले. मात्र, यूपी वॉरियर्सने १९.३ षटकात मुंबईच्या धावांचा पाठलाग करून सामना खिशात टाकला. (Latest Marathi News)

वुमेन प्रीमीयर लीगच्या १५ व्या सामन्यात मुंबई (Mumbai) इंडियन्सला पहिल्यांदा पराभवाला सामारे जावं लागलं. यूपी वॉरियर्सने नाणेफेकीचा कौल जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या मुंबईने २० षटकात १२७ धावा ठोकल्या. या आव्हानांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यूपी वॉरियर्सने १९.३ षटकात लक्ष्य पूर्ण करून सामना जिंकला.

मुंबईचा संघ या लीगमध्ये सहा सामने खेळला आहे. या सहा सामन्यापैकी पाच सामने मुंबईने जिंकले आहेत. मुंबई या लीगमध्ये पहिल्यांदा सामना हरली आहे. तर मुंबईच्या संघाने पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये जागा पक्की केली आहे. शेवटच्या १२ चेंडूत यूपीला जिंकण्यासाठी १३ धावा हव्या होत्या. यावेळी धावपट्टीवर सोफी आणि दीप्ति शर्मा उभ्या होत्या. हेली मॅथ्यूजने १९ व्या षटकासाठी गोलंदाजी केली. तिने आठ धावा दिल्या.

MI vs UP Highlights
IPL 2023: ख्रिस गेलची भविष्यवाणी! विराट, रोहित नव्हे तर 'हाच' भारतीय तोडणार १७५ धांवाच्या खेळीचा रेकॉर्ड

शेवटच्या षटकात पाच धावा हव्या होत्या. पहिल्या दोन चेंडूत इस्सीने कोणताही धाव दिली नाही. त्यानंतर तिसऱ्या चेंडूत सोफी एक्सस्टोनने षटकार लगावत संघाला सामना जिंकून दिलं.

दरम्यान, यूपीने सहा सामन्यात तीन सामने जिंकले आहेत. यूपीचं स्थान या लीगच्या क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यूपीची टीमची शर्यत प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे. या लीगच्या क्रमावारीत मुंबई पहिल्या तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com