Prithvi Shaw Memes: 'भविष्यातील सचिन, आता गिलला..' पृथ्वी शॉच्या डबल सेंच्युरीनंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस..

Prithvi Shaw Double Hundred: या दमदार खेळीसह त्याने पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी भारतीय संघाचे दार ठोठावले आहे.
prithvi shaw viral memes
prithvi shaw viral memes saam tv
Published On

Prithvi Shaw Memes Viral Memes:

भारतीय संघातील आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ फॉर्ममध्ये परतला आहे. भारतीय संघातुन बाहेर असताना तो लंडनमध्ये सुरु असलेल्या रॉयल लंडन कप स्पर्धेत नॉर्थहॅम्पशायर संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या संघासाठी खेळताना त्याने तुफान फटकेबाजी करत दुहेरी शतकी खेळी केली आहे. या दमदार खेळीसह त्याने पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी भारतीय संघाचे दार ठोठावले आहे.

prithvi shaw viral memes
Team India News: एशिया कप २१ तर वर्ल्डकप ५७ दिवसांवर, टीम इंडियाला केव्हा मिळणार परफेक्ट प्लेइंग ११; काय आहेत आव्हानं? वाचा सविस्तर

पृथ्वी शॉने नॉर्थहॅम्पशायर संघाकडून खेळताना समरसेट संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात १५३ चेंडूंचा सामना करत २८ चौकार आणि ११ षटकारच्या मदतीने २४४ धावांची खेळी केली आहे. या खेळीदरम्यान त्याने समरसेट संघातील एकुण एक गोलंदाजाची धुलाई केली आहे. पृथ्वी शॉने या खेळीदरम्यान ८१ चेंडूंचा सामना करत आपले शतक पूर्ण केले. त्यानंतर १२९ चेंडूंचा सामना करत दुहेरी शतक पूर्ण केले.

गेल्या काही महिन्यांपासून फॉर्मच्या शोधात असलेला पृथ्वी शॉ अखेर फॉर्ममध्ये परतला आहे. त्याच्या या खेळीनंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने ट्विट करत लिहीले की, 'भविष्यातील सचिन, सेहवाग,लारा फॉर्ममध्ये परतला आहे. लवकरच त्याला शुबमन गिलच्या जागी खेळवायला हवं.

' दुसऱ्या एका .युजरने लिहिले की, 'पृथ्वी शॉने आपला फॉर्म असाच सुरू ठेवायला हवा, तरच तो भारतीय संघात कमबॅक करू शकतो.'

तर आणखी एका युजरचं असं म्हणणं आहे की, '१२९ चेंडूंचा सामना करत २०० धावांची खेळी हे दिल्ली कॅपिटल्स संघासाठी चांगले संकेत आहेत.मात्र त्याला भारतीय संघात स्थान मिळणं कठीण आहे.' (Latest sports updates)

पहिल्या सामन्यात झाला होता हिट विकेट..

पृथ्वी शॉला आपल्या काऊंटी कारकिर्दीतील पहिल्या सामन्यात हवी तशी सुरूवात करता आली नव्हती.

नॉर्थहॅम्पशायर संघाकडून पहिला सामना खेळताना पृथ्वी शॉला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पहिल्याच सामन्यात त्याला बाऊंसर चेंडूचा सामना करताना बाद व्हावं लागलं होतं. ग्लॉस्टरशायर संघातील गोलंदाज पॉल वॅन मीकरनने भन्नाट गतीने बाऊंसर चेंडू टाकला ज्यावर पृथ्वी शॉचा तोल गेला आणि त्याने स्वत: बॅट स्टंपला मारून घेतली.

पॉल वॅन मीकरनने टाकलेल्या भन्नाट गतीच्या चेंडूवर पृथ्वी शॉने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा प्रयत्न फसला.

चेंडू वाऱ्याच्या वेगाने यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हमध्ये गेला. मात्र पुल शॉटच्या प्रयत्नात असलेल्या पृथ्वी शॉचा तोल गेला आणि तो मैदानावर आपटला. पृथ्वी शॉला आपल्या पदार्पणाच्या सामन्यात केवळ ३४ धावा करता आल्या हो्त्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com