
नुकतंच टीम इंडियाचा क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला. दरम्यान टीम इंडियाचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहलपासून घटस्फोट झाल्यापासून पोटगी हा हा एक मोठा मुद्दा बनला आहे. हे दोघंही विभक्त झाल्यानंतर धनश्रीवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठवली जातेय. दरम्यान अशातच टीम इंडियाचा कर्णधार कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहनेही असं पाऊल उचललं की सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
रितिका सजदेह सध्या सोशल मीडियावर केलेल्या एका कृत्यामुळे चांगलीच चर्चेत आलीये. सोशल मीडियावरील अनेक पोस्टमध्ये धनश्री वर्माला 'गोल्ड डिगर' म्हटलं गेलंय. गोल्ड डिगर म्हणजे पैशांसाठी पुरुषाला फसवणारी असा याचा अर्थ आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशाच एका पोस्टला रितिकाने लाइक केलं आहे. याचा स्क्रिनशॉटही व्हायरल झाला आहे. मात्र ही पोस्ट तिने अनलाईक केल्याचं म्हटलं जातंय.
रितिकाचा एक लाईक हा धनश्री वर्मावर ४.७५ कोटी रुपयांची पोटगी घेतल्याबद्दलचा उपहास मानला जात आहे. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान, एक रील व्हायरल झालं असून ज्यामध्ये धनश्रीला लक्ष्य केल्याचं दिसून येतंय. रितिकाला हे रील लाईक केलं. त्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. या पोस्टला रितिकाने लाईक केल्याने थेट कमेंट न करता धनश्रीवर पैसे घेतल्याच्या आरोपाशी रितीका सहमत असल्याचं म्हटलं जातंय.
शुभांकर मिश्रा याने हे रील बनवलं असून त्याने धनश्रीला तिचं दुसरं आयुष्य सुरु करण्यासाठी फार अडचणींचा सामना करावा लागला," असं म्हटलं आहे. जर धनश्रीने पोटगी घेतलीये तर तिने आता स्वत:ला 'सेल्फ मेड वुमन' म्हणून नये. शुभांकर म्हणतो, चहल जे टी-शर्ट घातलेलं त्यावर बी युआर ओन शुगर डॅडी लिहिलेलं. दरम्यान धनश्रीची खिल्ली उडवण्यासाठीच चहलने हे टी-शर्ट घातलेलं. नैतिकता न पाळता धनश्री सक्षम असूनही तिने पोटगी घेतल्याच्या मुद्दावर शुभांकरचा आक्षेप असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून आलं.
सोशल मीडियावर धनश्रीला 'गोल्ड डिगर' म्हणजेच पैशांसाठी पुरुषाच्या मागे लागलेली स्त्री असा उल्लेख करण्यात आलेली ही पोस्ट रितीकाने लाईक केल्याच स्क्रीनशॉर्ट व्हायरल होतोय. रितिकाच्या या लाईकमुळे धनश्री चूक की बरोबर यावरुन या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.
(डिस्क्लेमर- या ठिकाणी देण्यात आलेल्या माहितीची आम्ही पुष्टी करत नाही)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.